ETV Bharat / state

साहित्याची जत्रा: बोली भाषेच्या संवर्धनासाठी उचललेलं पाऊल स्वागतार्हच, ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांचे मत - akhil bharatiy marathi sahitya sammelan sahitya sammelan

अहिराणी बोलीभाषेच्या भरीव कार्यासंदर्भात दिल्लीतील प्रतिष्ठित साहित्य अकादमीच्या वतीने 2000 ला 'भाषासन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला.

writer-krushna-patil-interview-with-etv-bharat
साहित्याची जत्रा: ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्याशी खास बातचीत
author img

By

Published : Jan 9, 2020, 8:39 PM IST

जळगाव - उस्मानाबादेत आयोजित करण्यात आलेले 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य विश्वाच्या इतिहासातील आजवरचे वेगळे आणि ऐतिहासिक असे साहित्य संमेलन असणार आहे. संमेलनाला लाभलेले अध्यक्ष तसेच बोलीभाषेला मिळालेले हक्काचे व्यासपीठ, ही या साहित्य संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. बोलीभाषेसाठी आयुष्य वेचणाऱ्या साहित्यिकांना या संमेलनात मानाचे स्थान मिळणार आहे. बोलीभाषेच्या संवर्धनासाठी उचललेलं पाऊल स्वागतार्ह असल्याचे मत ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले आहे.

साहित्याची जत्रा: ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्याशी खास बातचीत

हेही वाचा - साहित्याची जत्रा: महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्याशी खास बातचीत

अहिराणी बोलीभाषेच्या भरीव कार्यासंदर्भात दिल्लीतील प्रतिष्ठित साहित्य अकादमीच्या वतीने 2000 ला 'भाषासन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. यावेळी पाटील यांनी दिलखुलास मते मांडली. ते म्हणाले, आजवर पार पडलेल्या साहित्य संमेलनांमध्ये बोलीभाषांना हवं तसं स्थान मिळत नव्हते. मात्र, मराठी भाषेच्या अस्तित्त्वाचा आज प्रश्न निर्माण झाला आहे. मराठीला वाचविण्यासाठी बोलीभाषांचा उजागर करणे आवश्यक आहे. हेच ओळखून संमेलनाच्या आयोजकांनी बोलीभाषांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. मराठी वाचविण्यासाठी जरी हा निर्णय घेतला असला तरी बोलीभाषेचा एक समर्थक म्हणून मला तो स्वागतार्ह वाटतो. या संमेलनात 'पोत' नावाची स्मरणिका प्रकाशित होणार आहे. या स्मरणिकेसाठी विविध लेखकांकडून बोलीभाषांचे लेख, कविता मागाविण्यात आले आहेत. ही चांगली बाब आहे. या निमित्ताने बोलीभाषेसाठी झटणाऱ्या साहित्यिकांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल, असे पाटील म्हणाले.

बोलीभाषा आणि प्रमाणभाषा दोघांचा अवलंब करावा -

कोणताही माणूस जन्म घेतल्यानंतर आधी बोलीभाषेचा स्वीकार करतो. एकप्रकारे तो बोलीभाषेच्या संवर्धन प्रक्रियेतील एक घटक असतो. त्यानंतर तो प्रमाणभाषा शिकतो. मात्र, कोणत्याही नवोदित साहित्यिकाने व्यक्त होण्यासाठी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा दोघांचा अवलंब करायला हवा. केवळ प्रमाणभाषेचा अवलंब करणे माझ्या मते योग्य नाही. बोलीभाषेला प्रमाणभाषेची किनार असेल तर ते साहित्य सर्वांना आपलेसे वाटेल, असा सल्लाही यावेळी कृष्णा पाटील यांनी नवोदित साहित्यिकांना दिला.

Intro:जळगाव
उस्मानाबादेत आयोजित करण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य विश्वाच्या इतिहासातील आजवरचे वेगळे आणि ऐतिहासिक असे साहित्य संमेलन असणार आहे. संमेलनाला लाभलेले गैरमराठी अध्यक्ष तसेच बोलीभाषेला मिळालेले हक्काचे व्यासपीठ, ही या साहित्य संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. बोलीभाषेसाठी आयुष्य वेचणाऱ्या साहित्यिकांना या संमेलनात मानाचे स्थान मिळणार आहे. बोलीभाषेच्या संवर्धनासाठी उचललेलं पाऊल स्वागतार्हच आहे, असे मत जळगावातील ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले आहे.Body:अहिराणी बोलीभाषेच्या भरीव कार्यासंदर्भात दिल्लीतील प्रतिष्ठित साहित्य अकादमीच्या वतीने 2000 साली 'भाषासन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्याशी 'ई- टीव्ही भारत'ने उस्मानाबाद येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी पाटील यांनी दिलखुलास मते मांडली. ते पुढे म्हणाले, आजवर पार पडलेल्या साहित्य संमेलनांमध्ये बोलीभाषांना हवं तसं स्थान मिळत नव्हते. मात्र, मराठी भाषेच्या अस्तित्त्वाचा आज प्रश्न निर्माण झाला आहे. मराठीला वाचविण्यासाठी बोलीभाषांचा उजागर करणं आवश्यक आहे. हेच ओळखून संमेलनाच्या आयोजकांनी बोलीभाषांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. मराठी वाचविण्यासाठी जरी हा निर्णय घेतला असला तरी बोलीभाषेचा एक समर्थक म्हणून मला तो स्वागतार्ह वाटतो. या संमेलनात 'पोत' नावाची स्मरणिका प्रकाशित होणार आहे. या स्मरणिकेसाठी विविध लेखकांकडून बोलीभाषांचे लेख, कविता मागाविण्यात आले आहेत. ही चांगली बाब आहे. या निमित्ताने बोलीभाषेसाठी झटणाऱ्या साहित्यिकांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल, असे पाटील म्हणाले.

बोलीभाषा आणि प्रमाणभाषा दोघांचा अवलंब करावा-

कोणताही माणूस जन्म घेतल्यानंतर आधी बोलीभाषेचाच स्वीकार करतो. एकप्रकारे तो बोलीभाषेच्या संवर्धन प्रक्रियेतील एक घटक असतो. त्यानंतर तो प्रमाणभाषा शिकतो. मात्र, कोणत्याही नवोदित साहित्यिकाने व्यक्त होण्यासाठी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा दोघांचा अवलंब करायला हवा. केवळ प्रमाणभाषेचा अवलंब करणे माझ्या मते योग्य नाही. बोलीभाषेला प्रमाणभाषेची किनार असेल तर ते साहित्य सर्वांना आपलेसे वाटेल, असा सल्लाही यावेळी कृष्णा पाटील यांनी नवोदित साहित्यिकांना दिला.

साहित्यिकांच्या पदरी उपेक्षाच-

आजवर साहित्यिकांच्या पदरी उपेक्षाच आली आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. ते आपण पाहतोच आहोत. शासनाकडून ज्येष्ठ साहित्यिकांना योग्य तो सन्मान दिला जात नाही. एवढेच काय तर संशोधक साहित्यिकांना पाठबळ मिळत नाही. शासनाने जर संशोधक साहित्यिकांना अनुदान दिले तर निश्चितच साहित्याचा वारसा पुढे नेता येईल. मात्र, दुर्दैवाने तसे होत नाही. ज्यांना कोणाला पाठबळ मिळते, ते खरोखर साहित्यिक आहेत का, हा प्रश्नच आहे, अशी खंतही त्यांनी बोलताना व्यक्त केली.Conclusion:अहिराणीचे माधुर्य वर्णावे किती?

अहिराणी ही अतिशय सुंदर बोलीभाषा आहे. तिचे माधुर्य वर्णावे तरी किती? मराठीसह गुजराथी, हिंदी, तावडी, कोकणी अशा कितीतरी भाषांचा संगम अहिराणीत सापडतो. अहिराणी बोलीभाषेचा स्वतःचा एक आपलेपणा आहे. तिची एक विशिष्ट लकब आहे. अशा या अहिराणी बोलीभाषेचे संवर्धन व्हायला हवे. मी हयात असेपर्यंत अहिराणीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहील, असेही कृष्णा पाटील यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.