ETV Bharat / state

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण; विविध सामाजिक संघटनांकडून आरोपीच्या फाशीची मागणी - भानुदास विसावे न्यूज

हाथरस येथे नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अशी शहरातील सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि तेथील सरकार पूर्णपणे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

थाळीनाद आंदोलन
थाळीनाद आंदोलन
author img

By

Published : Oct 1, 2020, 4:54 PM IST

Updated : Oct 1, 2020, 5:18 PM IST

जळगाव - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे नुकत्याच घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे शहरातही पडसाद उमटले आहेत. विविध सामाजिक तसेच राजकीय संघटनांनी बलात्कार प्रकरणाचा निषेध केला. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र येत आंदोलन केले. या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी संघटनांनी एकमुखी मागणी केली आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उप प्रदेशाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर व जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. चर्मकार महासंघाचे इतर सदस्य व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

सर्वपक्षीय नेत्यांनी हाथरस येथील प्रकरणाचा नोंदविला निषेध-
जळगावातील महिला संघटनांसह सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवला. या घटनेच्या निषेधार्थ काळे फुगे हवेत सोडण्यात आले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि तेथील सरकार पूर्णपणे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विविध सामाजिक संघटनांकडून आरोपीच्या फाशीची मागणी

हेही वाचा-उत्तरप्रदेशात सगळीकडे जंगलराज पसरलंय, अत्याचाराच्या घटनांवरून काँग्रेस नेते आक्रमक

'नियाज अली मंच'तर्फे थाळीनाद-
घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी 'नियाज अली मंच'तर्फे थाळीनाद करण्यात आला. उत्तरप्रदेशात महिला व युवतींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांवर अंकुश ठेवण्यात तेथील सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करत नियाज अली मंचतर्फे कारवाईची मागणी करण्यात आली.

या आहेत आंदोलकांच्या मागण्या-
सामाजिक संघटनांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.

  • घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे.
  • आरोपींना कठोर शिक्षा करून पीडितेला त्वरित न्याय मिळाला पाहिजे.
  • या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
  • या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मागास समाजातील तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याच देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अतिशय संतापजनक असणाऱ्या या घटनेमुळे देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शहरातील काही सामाजिक व राजकीय संघटना एकत्र आल्या होत्या.

Last Updated : Oct 1, 2020, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.