ETV Bharat / state

धक्कादायक! जळगावात अज्ञातांनी रस्त्यावर फेकले वापरलेले पीपीई कीट

आज सकाळी काहीजण मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना खुबचंद साहित्य टॉवरजवळ रस्त्याच्या कडेला वापरलेले पीपीई कीट मोठ्या संख्येने फेकलेले दिसून आले. त्यात हॅन्डग्लव्ज, फेस मास्क, पीपीई किटमधील अ‌ॅप्रॉन असे साहित्य आहे.

used ppe kits found at roadside in jalgaon
जळगावात अज्ञातांनी रस्त्यावर फेकले वापरलेले पीपीई कीट
author img

By

Published : Aug 25, 2020, 11:53 AM IST

जळगाव - शहरातील मोहाडी रस्त्यावर असलेल्या खुबचंद साहित्य टॉवरजवळ रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी वापरलेले पीपीई कीट फेकून दिले आहेत. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. अशा प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता आहे. या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या खासगी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

used ppe kits found at roadside in jalgaon
जळगावात अज्ञातांनी रस्त्यावर फेकले वापरलेले पीपीई कीट

जळगाव शहरातील अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मोहाडी रस्त्यावर जात असतात. मंगळवारी सकाळी काही जण मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना खुबचंद साहित्य टॉवरजवळ रस्त्याच्या कडेला वापरलेले पीपीई कीट मोठ्या संख्येने फेकलेले दिसून आले. त्यात हॅन्डग्लव्ज, फेस मास्क, पीपीई किटमधील एप्रॉन असे साहित्य आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने काही सुज्ञ नागरिकांनी तातडीने सोशल मीडियावर या प्रकाराची माहिती व्हायरल केली. नियमानुसार, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरलेले पीपीई कीट हे जैविक कचऱ्यात वर्गीकृत करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करायला हवे. मात्र, जळगावात खासगी रुग्णालयांकडून पीपीई कीटची विल्हेवाट लावण्यात कमालीचा हलगर्जीपणा होत असल्याचे या प्रकारामुळे अधोरेखित झाले आहे.

महापालिका प्रशासनाने जैविक कचऱ्याचे संकलन करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचा दावा केला असला तरी अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, उघड्यावर फेकून दिलेले पीपीई कीट तत्काळ उचलून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.