जळगाव- औरंगाबाद प्रमाणे जळगाव शहरातही हजारोंच्या संख्येने एकाच रांगेत चालणाऱ्या विचित्र अळ्या आढळल्या आहेत. शहरातील रिंगरोड परिसरात असलेल्या श्रीनिवास कॉलिनीतील बगीच्यात या अळ्या आढळून आल्या आहेत. अळ्यांना पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वजनापूर येथे एकमेकांना चिकटून चालणाऱ्या अळ्या आढळून आल्या होत्या. त्या पाठोपाठ आता जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील श्रीनिवास कॉनीतही अशाच प्रकारच्या अळ्या चालताना आढळल्या आहेत. अशा अळ्या परिसरात यापूर्वी कधीही आढळल्या नाहीत. त्यामुळे अळ्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. वातावरणातील बदलांमुळे या अळ्या निर्माण झाल्या असाव्यात, असा अंदाज वर्तविला जात आहे. या अनोळखी अळ्यांची नागरिकांना भीती वाटू लागली आहे. ज्या बागेत अळ्या आढळल्या तेथे लहान मुले खेळतात. तसेच बागेच्या जवळच शाळा आहे. मुलांच्या आरोग्यावर अळ्यांचा दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून महापालिका प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.