ETV Bharat / state

रावेर मतदारसंघ : रक्षा खडसेंच्या विरोधात काँग्रेसकडून उल्हास पाटील

जळगाव लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना डॉ. उल्हास पाटील यांनी एकवेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पूर्वी जळगाव म्हणून असलेला हा मतदारसंघ आता रावेर म्हणून ओळखला जातो

उल्हास पाटलांना उमेदवारी जाहीर
author img

By

Published : Mar 31, 2019, 11:35 AM IST

जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी मुंबईत उल्हास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. डॉ. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने रावेरात त्यांची लढत भाजपच्या रक्षा खडसे यांच्यासोबत होणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेल्या आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रात रावेरची जागा राष्ट्रवादीकडे होती. मात्र, गेल्या २ पंचवार्षिक निवडणुकांपासून या मतदारसंघात राष्ट्रवादीला सातत्याने अपयश येत असल्याने यावेळी रावेरची जागा काँग्रेसला सोडावी, असा आग्रह काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळीने केला. निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होऊन देखील या जागेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होत नव्हते. अखेरपर्यंत भाजपला टक्कर देऊ शकेल, असा सक्षम उमेदवार राष्ट्रवादीला न मिळाल्याने राष्ट्रवादीने या जागेवरील हट्ट सोडत ती काँग्रेसला देऊ केली. जागा आपल्या वाट्याला आल्याने काँग्रेसने याठिकाणी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना डॉ. उल्हास पाटील यांनी एकवेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पूर्वी जळगाव म्हणून असलेला हा मतदारसंघ आता रावेर म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात मराठा, लेवा, आदिवासी आणि मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. जळगाव जिल्ह्यातील ५ तर बुलढाणा जिल्ह्यातील १ अशा ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची चांगली पकड आहे. भाजपकडून त्यांच्या सूनबाई म्हणजेच रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उल्हास पाटील यांना त्यांचे कडवे आव्हान असणार आहे.

Intro:Feed, cutaways send to FTP
जळगाव
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत उल्हास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. डॉ. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने रावेरात त्यांची लढत भाजपच्या रक्षा खडसे यांच्या सोबत होणार आहे.Body:काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेल्या आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रात रावेरची जागा राष्ट्रवादीकडे होती. मात्र, गेल्या दोन पंचवार्षिकपासून या मतदारसंघात राष्ट्रवादीला सातत्याने अपयश येत असल्याने यावेळी रावेरची जागा काँग्रेसला सोडावी, असा आग्रह काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळीने घेतला होता. निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होऊन देखील या जागेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होत नव्हते. अखेरपर्यंत भाजपला टक्कर देऊ शकेल, असा सक्षम उमेदवार राष्ट्रवादीला न मिळाल्याने राष्ट्रवादीने या जागेवरील हट्ट सोडत ती काँग्रेसला देऊ केली. जागा आपल्या वाट्याला आल्याने काँग्रेसने याठिकाणी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.Conclusion:जळगाव लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना डॉ. उल्हास पाटील यांनी एकवेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पूर्वी जळगाव म्हणून असलेला हा मतदारसंघ आता रावेर म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात मराठा, लेवा, आदिवासी मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. जळगाव जिल्ह्यातील पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एक अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात माजीमंत्री एकनाथ खडसे यांची चांगली पकड आहे. भाजपकडून त्यांच्या सून रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उल्हास पाटील यांना त्यांचे कडवे आव्हान राहणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.