ETV Bharat / state

दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे सोंग म्हणजे निव्वळ धूळफेक; उज्ज्वल निकम यांची पाकिस्तानवर टीका - Al Qaeda

पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यासह अन्य २३ दहशतवाद्यांविरोधात तेथील न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, हा प्रकार म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका उज्ज्वल निकम यांनी केली आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम
author img

By

Published : Jul 13, 2019, 5:05 PM IST

जळगाव - दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यासह अन्य २३ दहशतवाद्यांविरोधात तेथील न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, हा प्रकार म्हणजे जगाच्या डोळ्यात होणारी निव्वळ धूळफेक आहे. पाकिस्तान फक्त कारवाईचे सोंग करत आहे, अशी टीका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत 'ई टीव्ही भारत'ने उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढल्याने पाकिस्तान सरकारची कोंडी झाली आहे. दहशतवादाविरुद्ध आपण काहीतरी कारवाई करत आहोत, हे दाखविण्यासाठीच त्यांनी हाफिज सईद, अब्दुल मक्की, आमीर हमजा यांच्यासह २३ दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या. पण पाकिस्तान जगाला फसवत आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यासंदर्भात डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदविण्यात आली होती. तेव्हा हेडलीने सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून तो लष्कर-ए-तोयबा आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे तर २६/११ हल्ल्यावेळी भारताने जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याने देखील कबुली जबाबात सईद हा पाकिस्तानात असून तोच लष्कर-ए-तोयबा आणि अल कायदा या संघटना चालवत असल्याचे सांगितले होते. तसे पुरावे देखील भारताने पाकिस्तानला दिले होते. मात्र, आजवर पाकिस्तानने याप्रश्नी सईदवर कारवाई केलेली नाही.

सईदची संघटना जी पूर्वी लष्कर ए तोयबा होती, ती आता जमात उल दावा आहे. ती सेवाभावी संघटना आहे. सईद दहशतवादी असल्याचे पुरावे नाहीत, असे पाकिस्तान सांगतो. यावरुन पाकिस्तान सरकार मारल्यासारखे करत आहे, तर त्यांच्या आश्रयाखाली राहणारे दहशतवादी रडल्यासारखे करत असल्याचे स्पष्ट होत आहे. पुढे पाकिस्तान असेही म्हणू शकतो, की आम्ही दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या. पण आमची न्यायालय व्यवस्था स्वतंत्र आहे. न्यायालयाने त्यांना सोडले तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असा आव देखील ते आणू शकतात, असेही निकम म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यासह अन्य २३ दहशतवाद्यांविरोधात तेथील न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, हाफिज सईद याच्यासह काही दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारने दाखल केलेल्या याचिकांना आव्हान दिले आहे. पाकिस्तानचे केंद्र सरकार, पंजाबचे प्रांतीय सरकार आणि पाकिस्तान सरकारचा दहशतवाद प्रतिबंधक विभागाला त्यांनी प्रतिवादी केले आहे. आमचा लष्कर-ए-तोयबा, अल कायदा या सारख्या दहशतवादी संघटनांशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या विरोधातील कारवाईचे हे षडयंत्र आहे. त्यामागे भारतीय लॉबी कार्यरत असल्याचे उलट्या बोंबा देखील या दहशतवाद्यांनी मारल्या आहेत.

Intro:जळगाव
दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यासह अन्य 23 दहशतवाद्यांविरोधात तेथील न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, हा प्रकार म्हणजे जगाच्या डोळ्यात होणारी निव्वळ धूळफेक आहे. पाकिस्तान फक्त कारवाईचे सोंग करत आहे, अशी टीका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे.Body:पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत 'ई टीव्ही भारत'ने उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढल्याने पाकिस्तान सरकारची कोंडी झाली आहे. दहशतवादाविरुद्ध आपण काहीतरी कारवाई करत आहोत, हे दाखविण्यासाठीच त्यांनी हाफिज सईद, अब्दुल मक्की, आमीर हमजा यांच्यासह 23 दहशतवाद्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या. पण पाकिस्तान जगाला फसवत आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यासंदर्भात डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदविण्यात आली होती. तेव्हा हेडलीने हाफिज सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून तो लष्कर-ए-तोयबा आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे तर 26/11 हल्ल्यावेळी भारताने जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याने देखील कबुली जबाबात सईद हा पाकिस्तानात असून तोच लष्कर-ए-तोयबा आणि अल कायदा या संघटना चालवत असल्याचे सांगितले होते. तसे पुरावे देखील भारताने पाकिस्तानला दिले होते. परंतु, आजवर पाकिस्तानने याप्रश्नी सईदवर कारवाई केलेली नाही. सईदची संघटना जी पूर्वी लष्कर ए तोयबा होती; ती आता जमात उल दावा आहे. ती सेवाभावी संघटना आहे. सईद दहशतवादी असल्याचे पुरावे नाहीत, असे पाकिस्तान सांगतो. यावरून पाकिस्तान सरकार मारल्यासारखे करत आहे, तर त्यांच्या आश्रयाखाली राहणारे दहशतवादी रडल्यासारखे करत असल्याचे स्पष्ट होत आहे. पुढे पाकिस्तान असेही म्हणू शकतो की आम्ही दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या. पण आमची न्यायालय व्यवस्था स्वतंत्र आहे. न्यायालयाने त्यांना सोडले तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असा आव देखील ते आणू शकतात, असेही निकम म्हणाले.Conclusion:नेमकं काय आहे प्रकरण?
पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यासह अन्य 23 दहशतवाद्यांविरोधात तेथील न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, हाफिज सईद याच्यासह काही दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारने दाखल केलेल्या याचिकांना आव्हान दिले आहे. पाकिस्तानचे केंद्र सरकार, पंजाबचे प्रांतीय सरकार व पाकिस्तान सरकारचा दहशतवाद प्रतिबंधक विभागाला त्यांनी प्रतिवादी केले आहे. आमचा लष्कर-ए-तोयबा, अल कायदा या सारख्या दहशतवादी संघटनांशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या विरोधातील कारवाईचे हे षडयंत्र आहे. त्यामागे भारतीय लॉबी कार्यरत असल्याचे उलट्या बोंबा देखील या दहशतवाद्यांनी मारल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.