ETV Bharat / state

Two Youth Died in Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू - accident in Jalgaon

जळगाव-भुसावळ रस्त्यावरील दूरदर्शन टॉवरजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जळगावातील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.परवेज निसार खाटीक व अमिर जाकीर खाटीक (दोघे रा. जळगाव), असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांचे नाव आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Mar 26, 2022, 10:52 PM IST

जळगाव - जळगाव-भुसावळ रस्त्यावरील दूरदर्शन टॉवरजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जळगावातील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.परवेज निसार खाटीक व अमिर जाकीर खाटीक (दोघे रा. जळगाव), असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांचे नाव आहे.

परवेज व अमिर हे दोघे कामानिमित्त भुसावळ येथे गेले होते. शनिवारी (दि. 26 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रस्त्यावर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज याचा जागीच मृत्यू झाला तर अमीर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी ताचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. दोघा तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - Murder in Jalgaon : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; जळगाव पुन्हा हादरले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.