ETV Bharat / state

भुसावळ रेल्वे यार्डात मालगाडीचे दोन डबे घसरले

author img

By

Published : Jul 12, 2019, 11:14 PM IST

मालगाडी नागपूरहून मुंबईकडे जाताना मालगाडीच्या एका डब्याचा एक्सल तुटल्याने रुळावरून डबे घसरले होते. मात्र, इतर प्रवासी रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भुसावळ रेल्वे यार्डात मालगाडीचे दोन डबे घसरले

जळगाव - भुसावळ येथील रेल्वे यार्डातील जुन्या शेडजवळ असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरून मालगाडीचे दोन डबे घसरले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. क्रेनच्या मदतीने घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्यात आले असून वाहतूक व्यनस्थीत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मालगाडी नागपूरहून मुंबईकडे जाताना मालगाडीच्या एका डब्याचा एक्सल तुटल्याने तो रुळावरून घसरला. त्यामुळे एक्सल तुटलेल्या डब्याच्या मागील डबा देखील घसरला. यार्डात गाडीचा वेग कमी असल्याने चालकाला लगेच या प्रकाराचा अंदाज आल्याने रेल्वे थांबवली. या घटनेनंतर रेल्वे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्याची तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली. घसरलेले डबे रुळावर ठेवण्यासाठी दोन क्रेनची वापरण्यात आले. अशाप्रकारे रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेने दोन तासात वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या घटनेमुळे यार्डातील अन्य मालगाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, प्रवासी रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Intro:जळगाव
भुसावळ येथील रेल्वे यार्डातील जुन्या शेडजवळ असलेल्या रेल्वे क्राॅसिंगवरून मालगाडीचे दोन डबे घसरले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. महाकाय क्रेनच्या मदतीने घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्यात आले. या कामासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागला.Body:मालगाडी नागपूरकडून मुंबईकडे जाताना ही घटना घडली. मालगाडीच्या एका डब्याचा एक्सल तुटल्याने तो घसरला. त्यामुळे एक्सल तुटलेल्या डब्याच्या मागील डबा देखील रुळावरून घसरला. यार्डात गाडीचा वेग कमी असल्याने चालकाला लगेच या घटनेचा अंदाज आल्याने त्याने गाडी थांबवली. या घटनेनंतर रेल्वेचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. घसरलेले डबे पुन्हा रुळांवर ठेवण्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली. घसरलेले डबे रुळांवर ठेवण्यासाठी दोन महाकाय क्रेन आणण्यात आल्या होत्या. रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणेने दोन तासात घसरलेले डबे रुळांवर ठेवत वाहतूक सुरळीत केली.Conclusion:दरम्यान, या घटनेमुळे यार्डातील अन्य मालगाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, प्रवासी रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही स्वरुपाचा परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.