जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 803 वर पोहचला आहे. चिंतेची बाब म्हणजे, मंगळवारी देखील जिल्ह्यात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगावसह अमळनेर आणि भुसावळ नगरपालिका परिसरात 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडणे शक्य असले तरी, यापूर्वी एकमेकांच्या संपर्कात आलेल्यांमुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जळगाव शहर 92, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 6, अमळनेर 1, चोपडा 11, भडगाव 5, धरणगाव 2, यावल 6, एरंडोल 3, जामनेर 5, रावेर 15, पारोळा 26, चाळीसगाव 18, बोदवड 15 तसेच इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
मंगळवारी 11 जणांचा मृत्यू-
कोरोनाची लागण झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. वयोवृद्ध किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना अधिक त्रास होवून त्यांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांपैकी 215 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाने दिला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जळगाव शहरात रुग्णसंख्येने ओलांडला हजारांचा टप्पा-
जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात मंगळवारी सर्वाधिक 92 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. मंगळवारी आढळून आलेले बहुतांश रुग्ण हे नवीन परिसरातील आहेत. यामुळे शहरातील एकूण बाधितांचा आकडा 1 हजार 95 वर पोहचला आहे.
कोरोना अपडेट-
जळगाव शहर 1095
जळगाव ग्रामीण 198
भुसावळ 490
अमळनेर 392
चोपडा 321
पाचोरा 107
भडगाव 259
धरणगाव 202
यावल 281
एरंडोल 238
जामनेर 249
रावेर 350
पारोळा 286
चाळीसगाव 93
मुक्ताईनगर 81
बोदवड 146
एकूण रुग्णसंख्या 4803