जळगाव - येथील शनिपेठ परिसरात रविवारी रात्री दगडफेकीची घटना घडली आहे. शनिपेठेतील गवळीवाड्यात दोन गटांत रात्रीच्या अचानक तुफान दगडफेक सुरु झाली. वादाचे नेमका कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास गवळीवाड्यात दोन गटातील वादाचे पर्यावसान दगडफेकीत झाले. या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने, रस्त्यावर दगड मुबलक दगड होते. दोन गटात वाद सुरु झाल्यानंतर याच दगडांचा वापर करण्यात आला. दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली. रस्त्यावर दगडांचा अक्षरशः खच पडला होता. यादरम्यान एक चारचाकीही जमावाकडून फोडण्यात आल्याची माहिती मिळाली.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह शनिपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र दगडफेकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा : Jalgaon Kelkar Market Fire : जळगावातील केळकर मार्केट परिसरातील दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान