ETV Bharat / state

जळगाव : श्रावण सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, दोघे ठार, ८ जखमी - रावेर अपघात बातमी

श्रावण सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात दोघे भाविक जागीच ठार झाले.

accident
अपघातात दोन भाविकांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 24, 2021, 7:04 PM IST

जळगाव - श्रावण सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात दोघे भाविक जागीच ठार झाले तर ८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल गावाजवळ सोमवारी रात्री उशिरा घडला. गोलू बंडू परदेशी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दोघे जळगाव शहरातील कांचननगरातील रहिवासी होते.

  • मालवाहू वाहनाने गेले होते दर्शनाला-

जळगाव शहरातील कांचननगरातील काही तरुण भाविक मालवाहू गाडी (एमएच- १९ सीवाय ५३१५) मधून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या शिरवेल येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले होते. दर्शन घेऊन सोमवारी रात्री हे सर्व जण घरी परतत होते. पालजवळ वनविभागाच्या नाक्यापासून काही अंतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला उलटली.

  • दोघे ठार तर इतर जण जखमी-

या अपघातात गोलू परदेशी व प्रशांत तांदुळकर हे दोघे जागीच ठार झाले. तर अजय सुनील वाल्हे (वय २१), गणेश रवींद्र सोनवणे (वय २३), परेश निंबा सोनवणे (वय २६), चेतन रवींद्र मोरे (वय २३), पवन रवींद्र मोरे (वय २२), महेश गोविंदा सोनवणे ( वय २१), गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) हे जखमी झाले. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - देऊळगावराजा बायपास मार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, वृद्ध महिला ठार तर 25 प्रवासी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.