ETV Bharat / state

लाखो रुपयांचे सोने चोरणारे दोघे अटकेत; १० लाखांचा मुद्देमाल जप्त - जळगाव सोने चोरी न्यूज

४ डिसेंबर २०२० रोजी नंदगाव (ता. जळगाव) येथील शदर भास्कर धनगर यांच्या बंद घरातून २५ हजार रुपये रोख व २५ हजार रुपयांचे दागिने चोरी गेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन अट्टल सोने चोरांना अटक केली आहे.

Criminals
आरोपी
author img

By

Published : Feb 7, 2021, 11:24 AM IST

जळगाव - जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्याकरून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी लंपास केले होते. हे सोने त्यांनी शहरातील एका मित्राच्या गॅरेजमध्ये ठेवले होते. या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाख १ हजार ६० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. हे दोन्ही चोरटे एकमेकांचे मेहुणे आहेत.

विविध ठिकाणी चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले

दोघांनी अनेक ठिकाणी केल्या आहेत घरफोड्या -

शेख नाजीम शेख रशिद (वय २८, रा. मलिकनगर) व शेख अरबाज शेख मेहमुद (वय २०, रा. अक्सानगर) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. अरबाज हा नाजीमचा मेहुणा आहे. दोघेजण गेल्या काही वर्षांपासून घरफोड्या करत आहेत. दोघांनी गेल्या महिन्यांमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी हातसफाई केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.

आरोपी
आरोपी

पथकाने गॅरेजमध्ये जाऊन दागिने घेतले ताब्यात -

सुमारे दोन महिन्यांपासून पोलीस दोघांच्या मागावर होते. त्यासाठी विशेष पथकही तैनात केलेले होते. दरम्यान, हे दोघे अजिंठा चौफुली परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने चौकाच्या चारही दिशांना थांबून सापळा रचला. मिळालेल्या माहितीप्रमाणे अरबाज व नाजीम हे दोघे अजिंठा चौफुलीवरील एका पानटपरीवर पान घेण्यासाठी थांबले. त्यांना ओळखणारा एक पोलीस कर्मचारी टपरीच्या अगदी शेजारी थांबून होता. दोघांनी पान घेताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलीस मुख्यालयात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अनेक घरफोड्यांमध्ये चोरलेले दागिने कालिका माता मंदिर परिसरातील मित्राच्या गॅरेजमध्ये लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने गॅरेजमध्ये जाऊन दागिने ताब्यात घेतले. १० लाख १ हजार ६० रुपयांचे हे दागिने आहे. दरम्यान, या चोरट्यांनी नंदगाव (ता. जळगाव) येथील शदर भास्कर धनगर यांच्या बंद घरातून २५ हजार रुपये रोख व २५ हजार रुपयांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ४ डिसेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. याच गुन्ह्यात सध्या दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. रवी नरवाडे तपास करत आहेत.

'यांनी' केली कारवाई -

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल रवी नरवाडे, राजेश मेढे, सुनिल दामोदरे, संजय हिवरकर, संदीप पाटील, महेश महाजन, प्रविण मांडोळे, संजय चौधरी, किरण चौधरी, परेश महाजन, इंद्रीस पठाण आणि राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.