जळगाव - जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यात प्रक्रियेत छाननीनंतर 19 हजार 983 अर्ज वैध ठरले तर 288 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. आता माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये कोण माघार घेतो, कोण रिंगणात राहतो? याकडे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींमधील 2 हजार 670 प्रभागांमध्ये 7 हजार 213 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर अखेर 20 हजार 271 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 19 हजार 983 उमेदवारी अर्ज वैध ठरले. तर 288 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. दरम्यान, माघारीसाठी उमेदवारांना 4 जानेवारीची मुदत असून, त्यानंतर चिन्ह वाटप होईल.
तालुकानिहाय अशी आहे वैध उमेदवारी अर्जांची संख्या-
जळगाव 1530
जामनेर 2024
धरणगाव 1121
एरंडोल 839
पारोळा 1458
भुसावळ 844
मुक्ताईनगर 1145
बोदवड 610
यावल 1219
रावेर 1153
अमळनेर 1348
चोपडा 1321
पाचोरा 2322
भडगाव 943
चाळीसगाव 2106