जळगाव - जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा विस्फोट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 492 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जळगाव शहर व तालुक्यासह चाळीसगाव, चोपडा या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
शहरात 124 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज जिल्ह्यात ४९२ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 144 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जळगावमध्ये तब्बल 124 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तालुक्यामध्ये 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चोपडा तालुक्यात 73 तर चाळीसगाव तालुक्यामध्ये 80 जणांना गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१२४, जळगाव ग्रामीण-५३, भुसावळ- २७, अमळनेर -२, चोपडा-७३, पाचोरा-५, भडगाव-३, धरणगाव-१३, यावल-२, एरंडोल-१७, जामनेर- ३७, रावेर-१८, पारोळा-८, चाळीसगाव-८०, मुक्ताईनगर-१८, बोदवड-७ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकूण ४९२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.