ETV Bharat / state

Jalgaon Roads : जळगावातील खराब रस्त्यांना कंटाळून नागरिकांनी केले स्वतःच रस्त्याचे काॅंक्रिटीकरण - Tired of Bad Roads in Jalgaon

जळगाव शहरात ( Jalgaon Municipal Corporation )रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र दिसून ( Dilapidated Condition of Roads ) येत आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगावतील रस्त्यांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, अनेक महिने उलटूनदेखील रस्त्यांची अद्याप दैना अवस्था पाहावयास मिळते. यामुळे या रस्त्याच्या अवस्थेला कंटाळून नागरिकांनी स्वतः वर्गणी करून आपल्या घरासमोरील रस्ते कॉंक्रिटीकरण करून घेण्यास जळगाव आज सुरुवात केली.

Roads in Jalgaon
जळगावातील रस्ते
author img

By

Published : Aug 4, 2022, 3:10 PM IST

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतर्फे ( Jalgaon Municipal Corporation ) कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील जळगावतील रस्त्यांची चाळणी ( Dilapidated Condition of Roads ) झाली आहे. यामुळे नागरिकांचे पाठीच्या आजाराला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. तर वाहनांचीही मोठे नुकसान होत आहे. मात्र, महानगरपालिकेतर्फे कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसून, स्वतः जळगावातील नागरिकांकडून आपल्या स्वखर्चाने स्वतःच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तर शहरातील इतर नागरिकांनाही वर्गणी गोळा करून आपापल्या गल्लीबोळातील रस्ते कॉंक्रिटीकरण करून घ्यावे, असे मतदेखील व्यक्त करण्यात आले.

व्हिडिओ

42 कोटी खर्चूनही रस्त्यांची दैना अवस्था : जळगाव शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगावतील रस्त्यांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, अनेक महिने उलटूनदेखील रस्त्यांची अद्याप दैना अवस्था पाहावयास मिळते. यामुळे या रस्त्याच्या अवस्थेला कंटाळून नागरिकांनी स्वतः वर्गणी करून आपल्या घरासमोरील रस्ते कॉंक्रिटीकरण करून घेण्यास जळगाव आज सुरुवात केली आहे.

स्वखर्चातून उभारले रस्ते : जळगाव शहरातील गणपती नगरात रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात नगरसेवकांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे यशवंत बारी यासाठी पुढे सरसावले. त्यांनी स्वखर्चाने आपल्या गल्लीत होणाऱ्या नागरिकांना त्रासापासून बचाव व्हावा याकरिता पुढाकार घेऊन सर्व गल्लीच्या नागरिकांच्या सहकार्याने वर्गणी जमा करून काँक्रीटचा रस्ता तयार केला. हा रस्ता तयार केल्याने परिसरात सकारात्मक चर्चा होत असून, पालिकेच्या निष्क्रियपणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

जळगावकरांनी स्वखर्चाने करून घ्यावे आपल्या घरासमोरील रस्ते : शहरातील गणपती नगरात एक दोन नव्हे तीन नगरसेवक आहेत. हायवेपासून गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा नगरसेवकांकडे केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या खराब रस्त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. यामुळे आता गल्लीतूनच पैसे जमा करून आपला स्वतःच रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा निर्धार नागरिकांनी घेतला आणि तो पूर्णही केला.

मनपाकडे निधी असूनही समस्या आहे तशाच : मनपा प्रशासनाकडे 42 कोटीचा निधी येऊ नही शहरवासीयांना आता प्रशासनातर्फे पावसाळा सुरू असल्याने रस्ते करू शकत नाही असे कारण सांगण्यात येत आहे. मात्र येथील नागरिकांनी भर पावसात आपल्या गल्लीत काँक्रिटीकरण करून एक वेगळाच आदर्श शहरवासीयांसाठी निर्माण केला. आणि इतरांनीही महानगरपालिकेच्या रस्त्या दुरुस्तीची वाट न पाहता स्वतः वर्गणी करून आपल्या परिसरातील रस्ते सुरळीत करावे जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही असे मत देखील नागरिकांनी उपस्थित केले.

पावसाळा सुरू असल्याने रस्त्याच्या कामांना लागला ब्रेक : जळगाव महानगरपालिकेमार्फत नागरिकांना सुविधा मिळाव्याl, याकरिता पुरेपूर उपायोजना करण्याचे काम सुरू आहे. मात्र, भर पावसात रस्ते बनवता येत नसल्याने सर्व काम रखडले आहे. यातच अमृत योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे शहरातील प्रत्येक गल्लीबोळातील रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून, यामुळे रस्ते अत्यंत खराब झालेले दिसून येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यावर तत्काळ रस्त्यांच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करून शहरवासी यांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका तत्पर राहील, असे मत आयुक्त विद्या गायकवाड यांनी व्यक्त केले.

जळगावातील रस्त्यांचा कायपालट कधी होणार : शहरातील रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे फिरणे ही कठीण झाले असून, नागरिकांना अनेक आजाराला सामोरे जावे लागत आहे. यामुळे काही नागरिक आपल्या घरासमोर स्वखर्चाने काँक्रीट करून घेत रस्त्यात होणारा चिखल आणि त्रासाला कंटाळून रस्ते बनविण्यास सुरुवात केल्याचे चित्र जळगावत पहावयास मिळते. तर नक्कीच परिसरातील नागरिकांना या काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याचा फायदा होणार असून, काही प्रमाणात होणारा त्रास कमी होणार आहे. मात्र महानगरपालिकेच्या वतीने जळगावतील रस्त्यांचा कायापालट कधी होणार हे मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे.

हेही वाचा : Maharashtra Cabinet Expansion : 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; वाचा भाजप-शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.