ETV Bharat / state

साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात ३ ठार, ३ जखमी - कार व बस अपघात

आज (रविवारी) रात्री 8 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील विचखेडे गावाजवळ कार व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातामध्ये 3 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत.

Jalgaon Accident
साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबियांवर घातली काळाने झडप
author img

By

Published : Feb 9, 2020, 10:24 PM IST

जळगाव - भरधाव कार एसटी बसवर आदळल्याने विचखेडेजवळ भीषण अपघात घडला. यात कारमधील 3 जण ठार झाले आहेत तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना आज (रविवारी) रात्री 8 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील विचखेडे गावाजवळ घडली. अपघातात ठार झालेले चौधरी कुटुंबीय हे धुळे येथील रहिवासी होते. नातेवाईकाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना चौधरी कुटुंबीयांवर काळाने झडप घातली.

साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबियांवर घातली काळाने झडप

हेही वाचा - सराफाला वाचवायला गेला अन् स्वतःच देवाघरी गेला

संजय चौधरी (वय-52), मीनल संजय चौधरी (वय-24) आणि सरला रवींद्र चौधरी (वय 65, तिघे रा. धुळे) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर नीता संजय चौधरी (वय 47), रवींद्र चौधरी (वय 67) आणि विवान चौधरी (वय 4, तिघे रा. धुळे) अशी जखमींची नावे आहेत. चौधरी कुटुंबीयांच्या नातेवाईकाचा रविवारी साखरपुडा होता. हा कार्यक्रम आटोपून चौधरी कुटुंबीय आपल्या (एमएच 18 बीसी 0575) क्रमांकाच्या कारने घरी परत येत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर विचखेडे गावाजवळ त्यांची कार धुळ्याकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या शिर्डी-भुसावळ या एसटी बसवर (एमएच 20, 3943) आदळली. त्यात संजय चौधरी, मीनल चौधरी आणि सरला चौधरी हे ठार झाले. तर नीता चौधरी, रवींद्र चौधरी आणि विवान चौधरी हे जखमी झाले.

Jalgaon Accident
साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबियांवर घातली काळाने झडप

अपघातानंतर विचखेडे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात हलवले आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. बसचेही समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचा चालक जागीच ठार झाला. तो कारच्या पत्र्यात अडकला होता. पारोळा येथून क्रेन मागवून कारमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा - डोळ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला.. अन् कट मारला म्हणून त्याचाच डोळा निकामी झाला

Intro:जळगाव
भरधाव कार एसटी बसवर आदळून भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील 3 जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज (रविवारी) रात्री 8 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील विचखेडे गावाजवळ घडली. अपघातात ठार झालेले चौधरी कुटुंबीय हे धुळे येथील रहिवासी होते. नातेवाईकाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना चौधरी कुटुंबीयांवर काळाने झडप घातली आहे.Body:संजय चौधरी (वय 52), मीनल संजय चौधरी (वय 24) आणि सरला रवींद्र चौधरी (वय 65, तिघे रा. धुळे) अशी या अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर नीता संजय चौधरी (वय 47), रवींद्र चौधरी (वय 67) आणि विवान चौधरी (वय 4, तिघे रा. धुळे) अशी जखमींची नावे आहेत. चौधरी कुटुंबीयांच्या नातेवाईकाचा रविवारी साखरपुडा होता. हा कार्यक्रम आटोपून चौधरी कुटुंबीय आपल्या (एम. एच. 18 बी. सी. 0575) क्रमांकाच्या कारने घरी परत येत होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर विचखेडे गावाजवळ त्यांची कार धुळ्याकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या शिर्डी-भुसावळ या एसटी बसवर (एम. एच. 20, 3943) आदळली. त्यात संजय चौधरी, मीनल चौधरी आणि सरला चौधरी हे ठार झाले. तर नीता चौधरी, रवींद्र चौधरी आणि विवान चौधरी हे जखमी झाले. अपघातानंतर विचखेडे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात हलवले.Conclusion:हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. बसचेही समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचा चालक जागीच ठार झाला. तो कारच्या पत्र्यात अडकला होता. पारोळा येथून क्रेन मागवून कारमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.