ETV Bharat / state

जळगावात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला सुरुवात; अंमलबजावणीसाठी प्रशासन रस्त्यावर

जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार म्हणजेच 12 ते 14 मार्चदरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.

Three-day public curfew begins in Jalgaon
जळगावात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला सुरुवात
author img

By

Published : Mar 12, 2021, 12:05 AM IST

जळगाव - जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार म्हणजेच 12 ते 14 मार्चदरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. या दरम्यान शहरात कोणत्याही भागात गर्दी होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनावर जबाबदारी सोपवली आहे. महापालिका प्रशासनाकडून सहा पथके तयार केली असून, ही पथके जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, आज (बुधवारी) रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी देखील रस्त्यावर उतरले आहेत.

जळगावात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूला सुरुवात
महापालिकेच्या प्रत्येक पथकात 25 कर्मचारी-
जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील अत्यावश्यक सुविधांव्यतिरिक्त इतर व्यावसायिक दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तरीही जनता कर्फ्यू दरम्यान इतर आस्थापने व दुकाने सुरू असल्यास किंवा विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याची जबाबदारी महापालिका व पोलीस प्रशासनावर आहे. महापालिकेच्यावतीने गठीत करण्यात आलेल्या सहा पथकांमध्ये एकूण 150 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक पथकात 25 अधिकारी व कर्मचारी असणार आहेत. कोणत्याही मार्केटमध्ये किंवा शहरातील रस्त्यांवर विनाकारण गर्दी झाल्यास महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. जनता कर्फ्यू हा जनतेने स्वयंस्फूर्तीने पार पाडायचा असला तरी, या कर्फ्यूमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जनता कर्फ्यूला पहिल्या दिवसापासून प्रतिसाद-
जनता कर्फ्यूला रात्री आठ वाजेपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून नागरिकांसह व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. एरवी रात्री उशिरापर्यंत वर्दळ असणाऱ्या प्रमुख भागांमध्ये रात्री आठ वाजेपासून शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील सुभाष चौक, सराफ बाजार, दाणाबाजार, बळीराम पेठ, टॉवर चौक, गोलाणी मार्केट व फुले मार्केट परिसर, बस स्थानक, आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौकादरम्यान शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यावसायिक मार्केटमधील दुकाने आठ वाजेच्या आत बंद झाली होती.
पोलिसांकडून बळाचा वापर नाही-
जनता कर्फ्यू हा नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जनता कर्फ्यूचा पहिला दिवस असल्याने पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर करण्यात आला नाही. रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना पोलीस अडवून जनता कर्फ्यूबाबत माहिती देत होते. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना देखील समज दिली जात होती. परंतु, यापुढे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढत राहिली तर मात्र पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली.

हेही वाचा- मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पंधराशेच्यावर रुग्ण, 1508 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.