ETV Bharat / state

चोरांनी मृताच्या टाळुवरचे लोणी खाल्ले.. जळगावच्या कोविड रुग्णालयात मृत वृद्धेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडले - जळगाव कोविड सेंटरमधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

जळगाव कोविड रुग्णालयात एका मृत वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अखेरचे दर्शन घेताना मृत महिलेच्या मुलाला हा प्रकार लक्षात आला. त्याने कोविड रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांच्याकडे लेखी तक्रार केली. दोषी आढळून येणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रभारी अधिष्ठाता म्हणाले.

Theft of gold Jewelry
जळगावच्या कोविड
author img

By

Published : Nov 11, 2020, 6:43 PM IST

जळगाव - येथील कोविड रुग्णालयात मृताच्या टाळूवरचे लोणी खाल्ल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका वृद्धेच्या मृत्यूनंतर तिच्या कानातील सोन्याचे दागिने अज्ञातांनी ओरबडून चोरल्याची घटना शुक्रवारी (१० नोव्हेंबर) समोर आली होती. नातेवाईकांनी मृत वृद्धेचा चेहरा पाहण्यासाठी कापड बाजुला सारल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणी नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी अर्ज केल्याने या प्रकाराची बुधवारी वाच्यता झाली.

इंदुबाई माणिकराव देवकर (वय ७०, रा. फर्दापूर, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांच्या कानातील दागिने चोरीस गेले आहेत. इंदुबाई यांना न्युमाेनियाचा त्रास जाणवत असल्यामुळे आठ दिवसांपूर्वी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट निगेटीव्ह आला. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, इंदुबाई यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या दोन्ही कानात एक तोळे वजनाच्या सोन्याच्या रिंग होत्या. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह पूर्णपणे प्लास्टिक कागदात गुंडाळून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यावेळी इंदुबाई यांचा मुलगा रवींद्र याने अखेरचे दर्शन घेण्यासाठी आईचा चेहरा उघडला. चेहऱ्यावरील कापड हटवल्यानंतर त्यांच्या दोन्ही कानातून रक्त आल्याचे दिसून येत होते. निरखून पाहिले असता इंदुबाई यांच्या दोन्ही कानातील सोन्याच्या रिंग अक्षरश: ओरबडून काढल्याचे दिसून आले. हे पाहून रवींद्र यांनी संताप व्यक्त केला. उपचारासाठी दाखल केलेल्या आईच्या कानातील दागिने चोरण्यासाठी थेट ओरबडल्याचा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला होता. रवींद्र यांनी संबंधित छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. यानंतर कोविड रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांच्याकडे लेखी तक्रार केली. मृत आईच्या कानातील दागिने गहाळ झाले असून योग्य ती चौकशी करावी. आम्हास न्याय द्यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

दोषींवर कठोर कारवाई करणार-

या घटनेसंदर्भात तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनार यांच्या नेतृत्त्वात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीत दोषी आढळून येणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डाॅ. मारुती पोटे यांनी दिली.

अत्यंत घाणेरडा प्रकार-

कोविड रुग्णालयात उपचार करण्यासाठी आईला दाखल केले होते. मृतदेह ताब्यात मिळाला तेव्हा कानातून रक्त आल्याचे दिसले. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग गहाळ झाल्या आहेत. या संदर्भात तक्रार केली आहे. हा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे, अशी माहिती मृत इंदुबाई यांचा मुलगा रवींद्र देवकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.