ETV Bharat / state

जळगाव: पोलन पेठेतील स्वीटमार्ट आणि लॉटरीच्या दुकानात चोरी

author img

By

Published : Dec 29, 2020, 8:18 PM IST

मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलन पेठमधील ब्रिजविलास स्वीटमार्ट तसेच शेजारील लॉटरीच्या दुकानात चोरीची घटना घडली.

theft in sweet mart and lottery shop in polan peth in jalgaon
जळगाव: पोलन पेठेतील स्वीटमार्ट आणि लॉटरीच्या दुकानात चोरी

जळगाव - केळकर मार्केट येथील दोन दुकाने फोडल्याच्या घटनेनंतर तीसऱ्या दिवशी चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलन पेठमधील ब्रिजविलास स्वीटमार्ट व एक लॉटरीचे दुकान फोडले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे स्वत: बंद केले. तत्पूर्वी ते कॅमेरात कैद झालेले होते. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे केले बंद-

नागेश्वर कॉलनीतील रहिवासी सतीश मुरारीलाल अग्रवाल यांचे पोलन पेठेत ब्रिजविलास स्वीटमार्ट नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारीच रितेश व्यास (रा. पोलनपेठ) यांचे लॉटरीचे दुकान आहे. ते दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहतात. सोमवारी रात्री ८:३० वाजता दोन्ही दुकाने बंद झाल्यानंतर मंगळवारी पहाटे दोन चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. अग्रवाल यांच्या दुकानात स्क्रु ड्रायव्हरच्या सहाय्याने ड्रॉव्हर तोडून त्यातील ८ हजार ५०० रूपये, तर व्यास यांच्या दुकानातून ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी १० वाजता अग्रवाल हे दुकान उघडण्यासाठी आले असताो, त्यांना कुलूप तुटलेले दिसून आले. यानंतर त्यांनी व्यास यांनाही याबाबत कळवले. दरम्यान, अग्रवाल यांच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरीचा सर्व प्रकार चित्रीत झाला आहे. परत जात असताना चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याचे दिसून येते आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'केंद्र सरकारकडून आश्वासनांची पूर्तता नाही; पुन्हा आंदोलन करणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.