ETV Bharat / state

जळगाव : राधाकृष्ण नगरात घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास - jalgaon city police station

जिनेंद्र मधुकर सैतवाल (वय-४७, रा. राधाकृष्ण नगर, नेमाडे नगर परिसर) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्याच्या मुलीचे 7 मार्च 2021 रोजी लग्न असल्यामुळे लग्नासाठी दागिने व रोकड घरात होते.

city police station, jalgaon
शहर पोलीस ठाणे, जळगाव
author img

By

Published : Feb 14, 2021, 10:11 PM IST

जळगाव - नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेल्या दाम्पत्याचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील लग्नाचे दागिन्यांसह रोकड चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही चोरीची घटना कानळदा रस्त्यावरील राधाकृष्ण नगरात घडली. या घटनेत, एकुण 1 लाख 58 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे.

शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -

जिनेंद्र मधुकर सैतवाल (वय-४७, रा. राधाकृष्ण नगर, नेमाडे नगर परिसर) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्याच्या मुलीचे 7 मार्च 2021 रोजी लग्न असल्यामुळे लग्नासाठी दागिने व रोकड घरात होते. दरम्यान, जामनेर येथे त्यांच्या भाचीचे लग्न असल्यामुळे 13 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता घराला कुलूप लावून परिवारासह जामनेरला निघून गेले. बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घर फोडून घरातील दोन लोखंडी कपाट फोडून कपाटातील 20 हजार रूपयांची रोकड, 93 हजार रूपये किंमतीचे 31 ग्रॅम सोने, 8 हजार 600 रूपये किंमतीची पायातील चांदीचे जोडवे, 37 हजार रूपये किंमतीचे मुलीच्या लग्नाच्या साड्या आणि घागरा, असा एकुण 1 लाख 58 हजार रूपये किंमतीची मुद्देमाल ऐवज लांबविला.

हेही वाचा - एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे! सोनू सूदने वाटल्या ई-रिक्शा

सकाळी शेजारी राहणाऱ्या वैशाली कैलास पाटील यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जितेंद्र सैतवाल यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी, सैतवाल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.