ETV Bharat / state

लाच घ्यायला आलेला पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा व्हाईस रेकॉर्डर घेऊन पळाला

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात एक धक्कादायक आणि पोलीस दलात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा प्रत्यय आणणारी घटना समोर आली आहे. गुन्ह्यात अनुकूल दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्याच्या मोबदल्यात सोनवणे यांनी ६ मार्चला तक्रारदाराकडून १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.

लाचखोर
लाचखोर
author img

By

Published : Mar 9, 2021, 9:32 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर शहरात एक धक्कादायक आणि पोलीस दलात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा प्रत्यय आणणारी घटना समोर आली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीच्या बाजूने अनुकूल दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्याच्या मोबदल्यात १९ हजार रुपयांची लाच घेण्यासाठी आलेला पोलीस चक्क लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे व्हाईस रेकॉर्डरच घेऊन पळून गेला. विलास बुधा सोनवणे (रा. अमळनेर) असे या पोलिसाचे नाव असून, तो धरणगाव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नियुक्तीला आहे.

काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील ४८ वर्षीय तक्रारदार हे धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विलास सोनवणे यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात अनुकूल दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्याच्या मोबदल्यात सोनवणे यांनी ६ मार्चला तक्रारदाराकडून १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.

संशय आल्याने पळून गेला पोलीस-
पोलीस नाईक विलास सोनवणे याने तक्रारदाराला पैसे घेऊन अमळनेर बसस्थानक परिसरात बोलावले होते. यावेळी तक्रारदाराने 'काही रक्कम कमी करा', असे सांगितले. तेव्हा पोलीस सोनवणे याला संशय आल्याने त्याने तक्रारदाराच्या खिश्याची झडती घेतली. त्यात त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेला व्हाईस रेकॉर्डर मिळून आला. आपल्यावर सापळा रचला आहे, याची कल्पना येताच सोनवणे तेथून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला गुंगारा देऊन पळून गेला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.