ETV Bharat / state

बीएचआर पतसंस्था घोटाळा : संशयित सुनील झंवर सोबत कनेक्शन असणाऱ्यांचे धाबे दणाणले!

author img

By

Published : Dec 1, 2020, 8:45 PM IST

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवरचे नाशिकमध्ये बोरा नामक ठेकेदार व आणखी एका धान्य व्यापाऱ्याशी कनेक्शन असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे.

बीएचआर पतसंस्था घोटाळा
बीएचआर पतसंस्था घोटाळा : संशयित सुनील झंवर सोबत कनेक्शन असणाऱ्यांचे धाबे दणाणले!

जळगाव - बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवरचे नाशिकमध्ये बोरा नामक ठेकेदार व आणखी एका धान्य व्यापाऱ्याशी कनेक्शन असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या माध्यमातून नाशकातील सातपूर-अंबड औद्योगिक क्षेत्रातही अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आणि त्यामध्ये बेनामी व्यवहार झाल्याचा संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याने संशयित आरोपी सुनील झंवरसोबत कनेक्शन असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवरच्या कार्यालयात छापे टाकल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या गैरव्यवहाराच्या चौकशीत प्रथमदर्शनी झंवरचे नाशिक कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले. त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. नाशिकमधील धान्य व्यापारी व महापालिकेतील ठेकेदार बोरा या दोघांच्या माध्यमातून नाशिकमध्ये औद्योगिक वसाहती बरोबरच इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, दरी, मातोरी आदी भागात अनेक मोठ्या फार्महाऊसवर व्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, झंवर याच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे नाशिकमधील त्याच्याशी संबंधित लोक अंडरग्राऊंड झाल्याचे बोलले जात आहे.

'वॉटरग्रेस'चा स्वच्छतेचा मक्ताही संशयाच्या घेऱ्यात

सुनील झंवर याच्या जळगावातील रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयातील छाप्यात आर्थिक गुन्हे शाखेला महापालिकेचा ७५ कोटी रुपयांचा स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीची काही कागदपत्रे व कर्मचाऱ्यांचे एटीएम कार्ड सापडले आहेत. त्यामुळे आता महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता देखील संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. वॉटरग्रेसच्या कागदपत्रांसह काही जणांची नावे व त्यापुढे रकमेचे आकडे लिहिलेली एक चिठ्ठी सापडल्याने त्याची कसून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे, हा मक्ता देण्यापासूनच याबाबत नागरिकांसह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. वॉटरग्रेस कंपनीने काम सुरू केल्यावर देखील तक्रारी कायम असल्याने त्यांचे काम देखील थांबवण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्यांचे काम सुरू करण्यात आले. आता कंपनीची कागदपत्रे सुनील झंवर याच्या कार्यालयात सापडल्याने वॉटरग्रेसचे सर्व काम झंवर याच्या कार्यालयातून सुरू असल्याचे निष्पन्न होत आहे. वॉटरग्रेसचा मक्ता दिल्यापासूनच हा मक्ता वादात होता. यामध्ये अनेक नगरसेवकांना हप्ते देखील मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला होता. त्यामुळे या मक्त्यामध्ये घोळ असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.

महापालिका सत्ताधारी व विरोधकांची वॉटरग्रेसबाबत चुप्पी

ऑगस्ट २०१९ मध्ये महापालिकेत वॉटरग्रेसचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी कंपनीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनेक तक्रारी करून मक्तेदाराची बिले रोखण्याचीही मागणी केली होती. सात महिन्यातच वॉटरग्रेसच्या कामांबाबत तक्रारी वाढत असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा मक्ता रद्द करण्याची मागणी करून, फेब्रुवारी २०२० मध्ये वॉटरग्रेसचे काम थांबवण्यात आले. त्यानंतर एस.के. कन्स्ट्रक्शनला तात्पुरता मक्ता देण्यात आला. मात्र, त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात वॉटरग्रेसचा मक्ता सुरू झाला. हा मक्ता सुरू झाल्यानंतर विरोधक शिवसेना व सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी वॉटरग्रेसबाबत होणाऱ्या तक्रारींबाबत साधलेली चुप्पी देखील आता संशयास्पद ठरली आहे.

चिठ्ठीतील नावे व आकडे कशाचे?

झंवर याच्या कार्यालयातून वॉटरग्रेसबाबत एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. यामध्ये काही अपूर्ण व कोड असलेली नावे आहेत. त्या नावांपुढे काही आकडे आहेत. सुमारे ४५ ते ६० नावे असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. मात्र, पोलीस पथकाने तपास सुरु असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या चिठ्ठीतील नावे व त्यापुढील आकड्यांबाबत राजकीय गोटात उत्सुकता निर्माण झाली आहे.

बीएचआरच्या मालमत्ता खरेदी व्यवहारांची होणार पडताळणी-

बीएचआर पतसंस्थेच्या असंख्य मालमत्ता ठराविक लोकांनीच कवडीमोल किंमतीत तसेच ठेव पावत्यांच्या मोबदल्यात घेतल्याचा संशय आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबतची सर्व कागदपत्रे तसेच मालमत्ता घेणाऱ्यांच्या कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आता आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून या मालमत्ता खरेदीच्या सर्व व्यवहारांची पडताळणी करण्यात येत आहे.

बीएचआर संचालक घोटाळा; ५ डिसेंबर रोजी सुनावणी

बीएचआर पतसंस्थेचे संचालक प्रमोद रायसोनीसह १३ जण ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा कारागृहात बंदी आहेत. राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल ८१ गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरू आहे. त्यात ५ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे. बीएचआरचे संचालक अंकल उर्फ प्रमोद रायसोनी यांच्यासह १३ संचालकांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे. यानंतर राज्यभरातील ठेवीदारांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये संचालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीचा तपास सुरू असून काही गुन्ह्यांचे दोषारोप, पुरवणी दोषारोप न्यायालयात दाखल झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या खटल्याच्या नियमित सुनावणी थांबल्या होत्या. आता ५ डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणीस सुरूवात होणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड. केतन ढाके त्यात सरकार पक्षाकडून काम पाहत आहेत.

कंडारेच्या चालकाकडून पोलीस कोठडीत गोलमाल उत्तरे

बीएचआर पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे याचा वाहनचालक कमलाकर कोळी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे. कोठडीत तो पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करत असून, गोलमाल उत्तरे देत दिशाभूल करत आहे. कोळी हा सतत कंडारेच्या सोबत राहत असल्यामुळे त्याला संपूर्ण हालचाली माहिती असाव्यात, अशी शक्यता आहे. कंडारेने लोकांच्या घेतलेल्या गुप्त भेटी, रचलेले कट देखील त्याला माहिती असू शकतात. कंडारे वारंवार सुनील झंवर याला भेटत होता, अशी माहिती कोळी याने पोलिसांना दिली आहे. कंडारेचा ठावठिकाणा कोळीला माहिती असू शकतो. पण तो माहिती पोलिसांपासून दडवून ठेवतो आहे. कोळी याच्याशिवाय आणखी दोन जण कंडारेचे वाहनचालक आहेत. त्यांची नावे कोळी याने पोलिसांना दिली आहेत. कोळीने दिलेल्या पत्त्यांवर पोलिसांनी चौकशी केली. परंतु, ते दोघे देखील अद्याप बेपत्ता आहेत.

कंडारे, झंवर अद्याप बेपत्ता

चार दिवसांपूर्वी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात बीएचआर पतसंस्थेशी निगडित विविध कार्यालये, आस्थापना तसेच संबंधित व्यक्तींच्या घरी छापासत्र राबवले. त्यानंतर या गैरव्यवहारातील प्रमुख संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय व्यावसायिक सुनील झंवर हे अद्यापही फरारच आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर आहे. दोघांच्या ठावठिकाणा संदर्भात पोलीस माहिती काढत असून, लवकरच दोघांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी वर्तवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.