जळगाव - कोरोना महामारीच्या साथीच्या उद्रेकामुळे अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. व्यापार, उद्योग, कृषी अशा क्षेत्रांवर कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम तर झाला आहेच, याशिवाय शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रही कोरोनामुळे प्रभावित झाली आहेत. जळगाव जिल्ह्याच्या वैचारिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारी तब्बल साडेचारशे वाचनालये कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहेत. वाचनालये बंद असल्याने ग्रंथसंपदा 'लॉकडाऊन' आहे. राज्य शासनाने आता लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करत काही बाबींना सशर्त सूट दिली आहे, त्याच धर्तीवर वाचनालये उघडून वैचारिक मेजवानी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाचनप्रेमींसह ग्रंथालय चालकांकडून केली जात आहे.
ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे साधन म्हणून पुस्तकांकडे पाहिले जाते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या पाच महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यातील सव्वाचारशे वाचनालयांमध्ये ग्रंथसंपदा लॉकडाऊन झाली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व सार्वजनिक वाचनालय बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वेळ आहे. हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तरी राज्य शासनाने सर्व सार्वजनिक वाचनालय सुरू करावीत, अशी मागणी वाचनप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. दिवसातून किमान चार तास तरी सार्वजनिक वाचनालये उघडी ठेवावीत, अशी मागणी होत आहे. वाचनालये मर्यादित वेळेत जरी उघडी राहिली तरी वाचकांची वाचनाची भूक भागून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात घरी बसण्याचा वेळ सत्कारणी लागून कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचा बचावही करता येईल, अशी वाचनप्रेमींचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यातील सव्वाचारशे वाचनालयातील ग्रंथसंपदा 'टाळेबंद' - ग्रंथालयांवर कोरोनाचा परिणाम न्यूज
जळगाव जिल्ह्यातील तब्बल साडेचारशे वाचनालये कोरोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद आहेत. ही वाचनालये उघडून वैचारिक मेजवानी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाचनप्रेमींसह ग्रंथालय चालकांकडून केली जात आहे.