ETV Bharat / state

"कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार अपयशी"

author img

By

Published : May 19, 2020, 11:31 PM IST

कोरोनाच्या मुद्द्यावरून आता राज्यात राजकारण पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज जळगावात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.

girish mahajan
गिरीश महाजन

जळगाव - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारकडून हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्य सरकार कोरोना विरुद्ध लढाईमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारकीच्या शपथविधीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडतात. मात्र, कोरोना संदर्भातील बैठकीसाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कामासाठी घराच्या बाहेरही पडत नाहीत. ते कोणाला साधं भेटतही नाहीत, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी आज जळगावात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

कोरोनाच्या मुद्द्यावरून आता राज्यात राजकारण पेटायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज जळगावात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला कोरोनावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. त्यानंतर गिरीश महाजन माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. गुरूमुख जगवानी, माजी जि. प. उपाध्यक्ष नंदू महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ घरी बसून कामकाज करत आहे. सरकार व प्रशासनात समन्वय नाही. अशीच स्थिती राहिली तर आगामी काळात राज्यातील कोरोनोचा आकडा 90 हजारांच्या घरात पोचेल. सरकारने वेळीच जागे व्हावे, कडक उपाय करावेत, यासाठी भाजपतर्फे 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकार त्यासाठी विविध पॅकेजची घोषणा करीत आहे. मात्र, राज्य सरकार त्याचा उपयोग योग्य रितीने करीत नसल्याने कोरोनाला रोखण्यात अपयश आले आहे.

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्‍टर, नर्स, आरोग्य सेवकांना पीपीई किट मिळत नाहीत. इतर आवश्‍यक साहित्य मिळत नाही. पोलिसांना संरक्षणासाठी साहित्य मिळत नसल्याने राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्राने नागरिकांना रेशनिंगवरून मोफत धान्याची घोषणा केली. पण ते धान्य वाटपातही गोंधळाची स्थिती आहे. दोन महिन्यांपासून राज्यातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो आहे, अशी टीकाही महाजन यांनी केली.

म्हणून ठाकरे सरकारचा निषेध...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ घरात बसून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काम चालवत आहेत. ते घराबाहेर पडत नाही. अधिकारी, आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेवत नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, चांगल्या कामाचे कौतुकही करीत नाही. सरकार व प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव आहे. यामुळे राज्यातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोना विषयात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा भाजपतर्फे आम्ही निषेध करत असल्याचे महाजय यावेळी म्हणाले.

कोरोनाच्या लढ्यात आम्ही सरकारसोबतच...

राज्यात भयावह परिस्थिती आहे. त्याच्यात आम्हाला राजकारण करायचे नाही. गेल्या 2 महिन्यांपासून आम्ही कोरोनाच्या लढ्यात आम्ही सरकारसोबतच आहोत. मी स्वतः आता मंत्री नाही, साधा आमदार आहे. पण तरीही मुंबई, नाशिक येथे जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. मात्र, राज्य सरकार स्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाहीत. पुढे पावसाळा येतोय. त्या अनुषंगाने राज्य सरकारने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोनाचे रुग्ण ठेवण्यासाठी आताच पुरेशी जागा नाही. पावसाळ्यात रुग्णांना कोठे ठेवले जाईल, याचे नियोजन नाही. आम्ही आताही गप्प बसलो तर जनता आम्हाला माफ करणार नाही. म्हणूनच सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय, असे गिरीश महाजन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.