ETV Bharat / state

बोदवडमध्ये लाचखोर तहसीलदारासह मंडळाधिकारी आणि तलाठ्याला अटक - Jalgaon Crime News

शेतजमीन नावावर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बोदवड येथील तहसीलदार, मंडळाधिकारी यांच्यासह तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई आज दुपारी बोदवड तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.

Tehsildar arrested for taking bribe
लाचखोर तहसीलदारासह मंडळाधिकारी आणि तलाठ्याला अटक
author img

By

Published : Dec 18, 2020, 5:54 PM IST

जळगाव - शेतजमीन नावावर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बोदवड येथील तहसीलदार, मंडळाधिकारी यांच्यासह तलाठ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई आज दुपारी बोदवड तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदारांसह मंडळाधिकारी आणि तलाठी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तहसीलदार हेमंत भागवत पाटील (वय ४०, रा. भरडी, ता. जामनेर, ह.मु. बोदवड), मंडळाधिकारी संजय झेंडू शेरनाथ (वय ४७, रा. प्रभाकर हॉल जवळ, श्रीराम निवास अपार्टमेंट, भुसावळ), तलाठी निरज प्रकाश पाटील (वय ३४, रा. हेडगेवार नगर, बोदवड) अशी या लाचखोर आरोपींची नावे आहेत.

काय होते प्रकरण?

या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे सन २००२ मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेती खरेदी केली होती. सदर शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले होते. कालांतराने सदर शेतीच्या उताऱ्यावर परत मूळ मालकाचे नाव आल्याने, तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी संजय शेरनाथ यांना भेटून सातबाऱ्यावर पत्नीचे नाव लावले, मात्र यावर तहसीलदार हेमंत पाटील यांनी हरकत घेऊन नोटीस काढली.

पाच लाखांची मागणी

ही नोटीस रद्द करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तहसीलदार हेमंत पाटील यांच्यावतीने मंडळाधिकारी संजय शेरनाथ व तलाठी नीरज पाटील यांनी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती शुक्रवारी दुपारी २ लाख रुपयांची लाच स्वीकारली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना अटक केली.

यांच्या पथकाने केली कारवाई

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक गोपाल ठाकूर यांच्यासह, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, नीलेश लोधी, सहायक फौजदार रवींद्र माळी, हेडकॉन्स्टेबल अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, सुरेश पाटील, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.