ETV Bharat / state

जळगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप - suspicious death in jalgaon

शरद कोळी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत औद्योगिक वसाहतीतील ई सेक्टरमध्ये आढळून आला. एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलिसांना दिली.

Dead Sharad Koli
मृत शरद कोळी
author img

By

Published : Nov 29, 2019, 4:33 PM IST

जळगाव - शहरातील कोळीपेठेत राहणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शरद विठ्ठल कोळी (वय 31, रा. कोळीपेठ, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली. दरम्यान, शरदचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त करून त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

जळगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

शरद कोळी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत औद्योगिक वसाहतीतील ई सेक्टरमध्ये आढळून आला. एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी येऊन पोलिसांनी प्राथमिक पंचनामा केला. मृत शरदची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी शरदच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

हेही वाचा - बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन, इंधन पुरवठा ठप्प

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटल्यानंतर शरदचे कुटुंबीय तसेच काही मित्र घटनास्थळी गेले. त्याठिकाणी असलेल्या परिस्थितीवरून शरदचा घातपात झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे कोळी कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.

हेही वाचा - रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय

शरदवर हल्ला झाल्याचा संशय -

शरद याच्या मृतदेहावर असलेल्या जखमांवरून त्याच्यावर हल्ला झाला असावा, अशी शक्यता आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा कोळी कुटुंबीयांचा आरोप आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:जळगाव
शहरातील कोळीपेठेत राहणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली. शरद विठ्ठल कोळी (वय 31, रा. कोळीपेठ, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, शरदचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त करून त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.Body:शरद कोळी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत औद्योगिक वसाहतीतील ई सेक्टरमध्ये आढळून आला. एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने या घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी येऊन पोलिसांनी प्राथमिक पंचनामा केला. मृत शरदची ओळख पटल्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी शरदच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटल्यानंतर शरदचे कुटुंबीय तसेच काही मित्र घटनास्थळी गेले. त्याठिकाणी असलेल्या परिस्थितीवरून शरदचा घातपात झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे कोळी कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.Conclusion:शरदवर हल्ला झाल्याचा संशय-

शरद याच्या मृतदेहावर असलेल्या जखमांवरून त्याच्यावर हल्ला झाला असावा, अशी शक्यता आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा कोळी कुटुंबीयांचा आरोप आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस अधिक तपास करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.