जळगाव - जळगाव जामोद वन परिसरात तरोडा बुद्रुक येथे ६ काळवीट आणि ४ हरीण मृत्यू झालेल्या अवस्थेत आढळले. (शनिवारी १५ मे) रोजी ही घटना उघडकीस आली. सदर प्राण्यांचा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सँपल प्रोगशाळेकडे पाठवले
जळगाव जामोद या तालुक्यात हरणांचा वावर असून, या तालुक्यामध्ये जंगल असल्याने प्राण्यांची संख्या जास्त आहे. आज शनिवारी जळगाव जामोद वन परिसरात हरणाचे मृतदेह आढळल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, येथील शिवारात ६ काळवीट आणि ४ हरणं मृतावस्थेत दिसले. सदर, प्राण्यांचे शव ताब्यात घेऊन त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला. यावेळी मृत झालेल्या हरणांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यातील काही भाग सँपल म्हणून प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.
हेही वाचा - चक्रीवादळापेक्षाही कोरोनावादळाला थांबवणे गरजेचे - संजय राऊत