जळगाव- भडगाव तालुक्यातील वाडे येथील तिखीबर्डी वस्ती लगतच्या वाडे शिवारातील धर्मा हिरामण मोरे यांच्या शेतातील पाळीव २५ गावरान कोंबड्यांचा अचानक मृत्यु झाल्याची घटना घडली ( Chickens died In Jalgaon ) आहे. या घटनेने कुक्कुटपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ऊन की विषबाधा..?
यात सुमारे १६ हजारांच्या जवळपास नुकसान झाले आहे. ही घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. ही कोंबड्यांची जीवघेणी घटना उन्हाचे वातावरण असल्याने झाली का विषबाधेमुळे झाली? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या शेतकऱ्याने शेतात गावरान कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय सुरु केला होता. शेत डोंगराळ भागात असल्याने शेतातील झोपड्यांजवळ खुराडयांमध्ये कोंबड्या जोपासल्या जातात. तर कधी कोंबड्या मोकळ्या जागेत शेतांमध्ये वावरतात. माञ, अचानक कोंबड्या दगावल्याने या शेतकऱ्यावर नुकसानीचे मोठे संकट ओढावले आहे. वाडे येथील तलाठी गायञी पाटील यांनी या नुकसानीची पाहणी केली असून, नुकसानीचा पंचनामा केला आहे. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहेत.