ETV Bharat / state

जळगाव: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानामुळे रुग्ण वेळेत शोधण्यात यश

author img

By

Published : Oct 3, 2020, 3:00 PM IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

success-in-finding-covid-patients-in-jalgaon-district
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान जळगाव

जळगाव- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. सुदैवाने या अभियानामुळे 910 कोरोनाबाधित रुग्ण वेळेत शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - 'राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, कदाचित त्यांचा तोल गेला असावा'

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान 15 सप्टेंबरपासून सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 532 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 6 लाख 50 हजार 602 घरांना भेट देवून 29 लाख 21 हजार 401 नागरिकांची 10 ऑक्टोबरपर्यंत तपासणी करणार आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 पेक्षा अधिक घरांना भेटी देत आहेत. या घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का? याची माहिती घेत असून ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करीत आहे. आवश्यकता भासल्यास या व्यक्तींची कोविडची चाचणी करून पुढील उपचार केले जात आहेत.

जिल्ह्यात 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 5 लाख 87 हजार 123 कुटूंबांना भेट दिली असून, या कुटूंबातील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 76 हजार 514 जुन्या विकारांचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, अस्थमा, किडनी विकार, क्षयरोग, लठ्ठपणासह इतर आजारांचाही समावेश आहेत. तर सारी व सर्दी, खोकला, तापाचे 6 हजार 808 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 910 कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात आरोग्य पथकांना यश आले आहे. या रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.