ETV Bharat / state

रिक्षाचा प्रवास बेतला विद्यार्थीनीच्या जीवावर; 'एसटी बस सुरू असती तर वाचली असती तृप्ती' - नातेवाईकांचा आक्रोश - Jalgaon rickshaw accident

धावत्या रिक्षातून तोल गेल्याने अकरावीमधील विद्यार्थिनी खाली पडली. या अपघातात तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. तिला उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ( Student dies after falling from rickshaw in Jalgaon ) घडली. 'एसटी बस सुरू असती तर वाचली असती तृप्ती' अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे.

Student dies after falling from rickshaw in Jalgaon
तृप्ती भगवान चौधरी
author img

By

Published : Mar 25, 2022, 6:30 PM IST

जळगाव - धावत्या रिक्षातून तोल गेल्याने अकरावीमधील विद्यार्थिनी खाली पडली. या अपघातात तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. तिला उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ( Student dies after falling from rickshaw in Jalgaon ) घडली. तृप्ती भगवान चौधरी असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. एस.टी. बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने महाविद्यालयात ये जा करत होती. व हाच रिक्षाचा प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.

Student dies after falling from rickshaw in Jalgaon
मयत तृप्ती भगवान चौधरी

अशी घडली घटना - तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला शिकत होती. ती एस.टी. ने प्रवास करायची मात्र गेल्या काही दिवसांपासुन एस.टी.कर्मचार्‍यांचा संप सुरु असल्याने एस.टी. बंद आहे. त्यामुळे तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये-जा करत होती. कॉलेजची वेळ सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी महाविद्यालयात आली. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी ऑटो रिक्षाने निघाली. यावेळी ती प्रवासी वाहतुक करणार्‍या खाजगी रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजुने बसली.

गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू - प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. जळगावला नेत असतांना वाटेतच तृप्तीची प्राणज्योत मालवली जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन होवुन त्यानंतर तृप्तीवर दुपारी ४ वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार झाले.

एसटी बस सुरू असती तर वाचली असती तृप्ती - विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Warns BJP : ..चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या'.. कुटुंबियांच्या बदनामीवर उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.