ETV Bharat / state

Etv Bharat Special :वाचा... तीन दिव्यांग मुले असलेल्या दाम्पत्याची करुण कहाणी

author img

By

Published : Mar 20, 2022, 4:16 PM IST

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील गोकुळ व कदंबा बाई गायकवाड दाम्पत्य राहतात. मोनाली, विरू, पंकज ही तीन आपत्ये पूर्णपणे दिव्यांग आहेत. शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची त्यांची खंत आहे.

patonda story
patonda story

जळगाव - सामान्यपणे जीवन जगताना अनेक जण आपले स्वप्न आकांक्षा व भविष्याची चिंता करत यशस्वी होण्याचे प्रयत्न करत असतात. मात्र नियतीने मन दिले. पण अठराविश्व दारिद्र्यात जगण्याची धडपडीचा प्रयत्न करणाऱ्या जळगावमधील गायकवाड कुटुंबाची कहाणी कोणाचेही मन हेलावून टाकणारी आहे.

गायकवाड कुटुंबाची कहाणी

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील गोकुळ व कदंबा बाई गायकवाड दाम्पत्य राहतात. नियतीने परीक्षा घ्यावी अशीच काही परिस्थिती या दाम्पत्यावर आली आहे. एकीकडे अठरा विश्व दारिद्र व त्यातच पोटी जन्माला आलेले मोनाली, विरू, पंकज हे तीन आपत्ये पूर्णपणे दिव्यांग आहेत. गोकुळ गायकवाड हे मोलमजुरी करतात.तर कदंबा बाई आपल्या तीन दिव्यांग मुलांचा सांभाळ करतात. स्वतःचे घर नाही, जमीन नाही, ना कोणता आधार अशात जीवन जगण्यासाठी व दिव्यांग मुलांसह पोटाची भूक भागवण्यासाठी हे कुटुंब आजही तारेवरची कसरत करत आहे.

घरात तीन दिव्यांग अपत्ये
एकाच घरात तीन दिव्यांग अपत्ये, अत्यंत गरिबीची स्थिती, यात मातेलाही एका डोळ्याने कमी दिसते ही भीषण आणि भयावह परिस्थिती कुणाची असू शकते अशी कुणी कल्पना देखील करू शकणार नाही. मात्र पातोंडा येथील गायकवाड कुटुंबावर ही आपत्ती कोसळली आहे. अनेक आले-गेले अनेकांनी मदतीची आश्‍वासने दिली. ती मदत तर सोडाच, पण शासकीय योजनांना देखील पुरेपूर लाभ मिळत नसल्याचे हे दाम्पत्य अक्षरश: जेरीस आले आहे.

शासनाकडून अपेक्षा
पातोंडा ग्रामपंचायतने या दांपत्याला एक झोपडी बांधून दिली. मात्र, त्यातला शौचालय ना काही मूलभूत सुविधा, एका अधिकाऱ्याने या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी दहा बकऱ्या दिल्या. मात्र, नियतीने इथेही परीक्षा घेत यातील काही बकऱ्या रोगराईमुळे मरण पावल्या. त्यामुळे उरलेल्या बकऱ्या चारून त्यातून मिळालेल्या तीन ते साडेतीन हजारात या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अनेकदा पोटाची भूक भागवण्यासाठी कदंबा बाई गावातील शिळ्या भाकरी जमा करून आपल्या दिव्यांग मुलांची व आपली भूक भागवतात.

दिव्यांग मुलांची स्वप्ने अधांतरीच
एकीकडे दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाने योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, शंभर टक्के अपंगत्व असूनही आजही दिव्यांग गायकवाड भावंड शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. या दिव्यांग बांधवांमध्ये मोनाली ही 25 वर्षाची , विरू हा वर्षाचा तर पंकज हा बारा वर्षाचा आहे. 100% दिव्यांग असूनही तीनही भावंडांचे मोठे होण्याचे स्वप्न आहे. तर बारा वर्षाच्या पंकजला शाळेत जाऊन डॉक्टर व्हायचं आहे. मात्र, पंकज नी पाहिलेले स्वप्न केवळ स्वप्न ठरणार आहे. कारण घरात अठरा विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ जीवन जगणे हेच या कुटुंबाच्या नशिबी आले आहे.

शौचालयाची वानवा
शासनाच्या योजना तर दूरच शासनाच्या योजनेतून शौचालय देखील या कुटुंबाला मिळाले नाही. त्यात दिव्यांग मुलांचे प्रात विधी पासून सर्व काही कदंबा बाई ना स्वतः हाताने स्वच्छ्ता करून बाहेर फेकावे लागते,अशी दुरवस्था या कुटुंबाची आहे. कदंबा बाई यांची मुलगी मोनाली पंचवीस वर्षाची झाली. मात्र, तिने अद्यापही आपल्या अंगणाशिवाय शेजारील घरही बघितले नाही. मोनाली हिला लोटांगण घेऊनच घरातल्या घरात फिरावे लागते. मोनालीची ही विदारक परिस्थिती पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येते. तर विरू हा अठरा वर्षाचा झाला असून त्याला देखील घरात तिथल्या तिथे आपल्या कमरेवर फिरता येते. तर दुसरीकडे मनात डॉक्टर बनण्याची जिद्द असलेल्या बारा वर्षाच्या पंकजला जिद्दीने आपले अस्तित्व सिध्द करायचे आहे.
हेही वाचा - Fir Against CM's Son : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवसह १४ जणांवर नाशिक मधे फसवणुकीचा गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.