ETV Bharat / state

'पक्ष कार्यालयात बोलावून अधिकाऱ्यांना दिली जाते अपमानास्पद वागणूक'

शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी या प्रकारच्या पायंड्याचा निषेध व्यक्त करत, प्रशासनाने याबाबत भूमिका निश्चित करण्याची मागणी केली.

जळगाव स्थायी समिती
जळगाव स्थायी समिती
author img

By

Published : Feb 25, 2021, 8:02 PM IST

Updated : Feb 25, 2021, 8:28 PM IST

जळगाव - महापालिकेच्या स्थायी समितीआधी नियोजनासाठी भाजपा नगरसेवकांची पक्ष कार्यालयात बैठक झाली. यात मनपा अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावरून गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पडसाद उमटले. शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी या प्रकारच्या पायंड्याचा निषेध व्यक्त करत, प्रशासनाने याबाबत भूमिका निश्चित करण्याची मागणी केली. तसेच हा प्रकार मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा असून, प्रशासनाने याबाबत दखल घेण्याचीही मागणी लढ्ढा यांनी केली.

गाजले आयत्यावेळचे विषय

मनपाच्या अंदाजपत्रकाची सभा संपल्यानंतर मनपा स्थायीची नियमित सभा सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत एकूण ६ विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये आयत्यावेळचे विषयच जास्त गाजले. नितीन लढ्ढा यांनी भाजपा कार्यालयात मनपा अधिकाऱ्यांनी लावलेल्या हजेरीवरून मनपा प्रशासनाला खडेबोल सुनावले. त्यावर सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध करत हा पायंडा खाविआच्या काळापासूनच असल्याचे सांगत लढ्ढा यांना विरोध केला.

नगरसेविका पतीकडून मनपा अधिकाऱ्याचा अपमान

नितीन लढ्ढा यांनी सभागृहात सांगितले, की मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापौर, उपमहापौर यांच्या दालनात बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतल्यास हे नियमात बसते. मात्र, अनधिकृत बैठकीत पक्ष कार्यालयात अधिकाऱ्यांना बोलाविले जाते. त्या बैठकीत नगरसेविकेच्या पतीकडून एका मोठ्या अधिकाऱ्याला झापले जाते, त्यांच्या अपमान केला जातो. हा प्रकार मनपा अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा असून, अनेक अधिकाऱ्यांनी या प्रकाराला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार केला असल्याचा धक्कादायक आरोप लढ्ढा यांनी या सभेत केला.

रस्त्यांच्या कामांची चौकशी कार्यालयातच बसून

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाबाबत शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी तक्रार करत ऑगस्ट महिन्यात झालेल्या सभेत चौकशी करण्याची मागणी केली होती. मनपाकडून सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवाला बरडे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बरडे यांनी मनपा अभियंत्यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करून, सर्व चौकशी मनपाच्या कार्यालयातच बसून केली असून, प्रत्यक्ष ठिकाणावर न जाताच ही चौकशी केल्याचा आरोप बरडे यांनी केला.

Last Updated : Feb 25, 2021, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.