ETV Bharat / state

प्रथमोपचाराच्या साधनांशिवाय धावतात एसटी बसेस, मोटार वाहन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन

प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनात प्रथमोपचाराची साधने असणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यात तशी तरतूद आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात सर्वत्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खासगी आराम बसेसच नव्हे, तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये देखील प्रथमोपचाराची कोणत्याही प्रकारची साधने नसल्याची धक्कादायक बाब 'ईटीव्ही भारत'ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

प्रथमोपचाराच्या साधनांशिवाय धावतात एसटी
प्रथमोपचाराच्या साधनांशिवाय धावतात एसटी
author img

By

Published : Jan 21, 2021, 1:11 PM IST

जळगाव - मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनात प्रथमोपचाराची साधने असणे आवश्यक आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात सर्वत्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खासगी आराम बसेसच नव्हे, तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये देखील प्रथमोपचाराची कोणत्याही प्रकारची साधने नसल्याची धक्कादायक बाब 'ईटीव्ही भारत'ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. अशा परिस्थितीत अपघात घडला किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर प्रवाशांवर प्रथमोपचार करायचे तरी कसे? हा प्रश्नच आहे. एकप्रकारे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

प्रथमोपचाराच्या साधनांशिवाय धावतात एसटी

प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक

प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनात प्रथमोपचाराची साधने असणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यात तशी तरतूद आहे. वाहनाला अपघात झाला किंवा एखाद्या प्रवाशाला आरोग्यविषयक समस्या उद्भवली तर त्याला दवाखान्यात नेण्यापूर्वी त्याच्यावर प्रथमोपचार व्हावेत, असा या मागचा उद्देश आहे. प्रत्येक प्रवासी वाहनात एक प्रथमोपचार पेटी असावी, त्या पेटीत डेटॉल, अँटिसेप्टिक मलम, बँडेज, वेदनाश्यामक गोळ्या असे साहित्य असायला हवे. परंतु, खासगी आराम बसेसच नव्हे तर एसटी महामंडळाच्या बसेसमध्येही अशा प्रकारची प्रथमोपचार पेटी नसते. धक्कादायक बाब म्हणजे, प्रथमोपचाराची साधने न बाळगणाऱ्या प्रवासी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई केली जात नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्येच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत आहे. अशा परिस्थितीत खासगी वाहनांच्या बाबतीत विचार न केलेलाच बरा, असे वास्तव आहे.

खासगी वाहन चालक नियमाविषयी अनभिज्ञ
जळगाव शहरातील नेरीनाका मैदानावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसेस थांबतात. याठिकाणी काही वाहन चालकांना प्रथमोपचार पेटीविषयी विचारणा केली असता, त्यांना मोटार वाहन कायद्यातील नियमांची माहितीच नसल्याचे समोर आले. आमच्या वाहनात कधी कोणत्या प्रवाशाला आजवर अशा साहित्याची गरज पडली नसल्याचे एका चालकाने सांगितले. कोणत्याही बसमध्ये अशी पेटी दिसली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खासगी वाहन चालक किती उदासीन आहेत, याचा प्रत्यय आला.

एसटी बसेसची स्थिती अत्यंत वाईट
जळगाव आगारातील काही एसटी बसेसची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले. पाहणी केलेल्या 10 ते 15 बसेसपैकी एकाही बसमध्ये प्रथमोपचाराची परिपूर्ण साधने असलेली पेटी नजरेस पडली नाही. काही बसेसमध्ये प्रथमोपचाराची पेटी दिसून आली नाही. तर काही बसेसमध्ये पेटी होती, परंतु, तिच्यात प्रथमोपचाराची साधनेच नव्हती. अनेक बसेसमध्ये तर प्रथमोपचार पेटी तुटलेली, झाकण नसलेल्या अवस्थेत दिसली. अशा स्थितीत प्रवाशी तर सोडा पण बस चालक किंवा वाहकाला आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार मिळू शकणार नाही, हे अधोरेखित झाले.

एसटीचे अधिकारी काय म्हणतात?
एसटी बसेसमध्ये प्रथमोपचाराची पेटी नसल्याबाबत जळगाव आगाराचे व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता 'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्यांनी सांगितले की, सुरुवातीला प्रत्येक एसटी बसमध्ये सर्व साधने असलेली प्रथमोपचार पेटी असायची. परंतु, अनेकदा या पेटीतील साहित्य चोरीला जाते. किंवा कालांतराने ती पेटी तुटून तिच्यातील साहित्य हरवते. यावर उपाय म्हणून प्रत्येक बसच्या वाचकाकडे प्रथमोपचाराचे साहित्य दिलेले असते. गरजेवेळी ते वाहक वापरतात. प्रथमोपचाराचे साहित्य गरजेनुसार आगारातून वाहक मागून घेत असतात, असे बोरसे म्हणाले. परंतु, नंतर दोन ते तीन वाचकांना प्रथमोपचाराच्या साहित्याविषयी विचारणा केली असता वाचकांनी, आमच्याकडे असे साहित्य दिले जात नसल्याचे सांगितले.

नियम काय आहे ?
प्रवासी वाहनातील प्रथमोपचाराच्या पेटीच्या नियमाबाबत जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनात प्रथमोपचाराची परिपूर्ण साधने असलेली पेटी असणे मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक आहे. एसटी बसेसला पण हा नियम लागू होतो. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनात जर प्रथमोपचार पेटी नसेल तर 2 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. वेळप्रसंगी त्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकते. प्रत्येक वाहनाच्या पासिंगवेळी तसेच भरारी पथकाच्या मोहिमेत प्रथमोपचार पेटीची तपासणी होते. वेळोवेळी अशा कारवाया केल्या जात असल्याचे श्याम लोही यांनी सांगितले.

हेही वाचा - अवैध बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.