ETV Bharat / state

दहावीचा पहिलाच पेपर फुटला; जळगावात मराठीची प्रश्नपत्रिका व्हायरल - परीक्षेचा पेपर फुटला जळगाव बातमी

मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‌ॅपवर व्हायरल झाली. काही तरुणांनी शिक्षकांच्या मदतीने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एक तरुण व्हाट्सअ‌ॅपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे परीक्षा केंद्राबाहेर शोधत असताना हा प्रकार उजेडात आला.

ssc-marathi-question-paper-goes-viral-on-whatsapp-in-jalgaon
दहावीचा पहिलाच पेपर फुटला
author img

By

Published : Mar 3, 2020, 1:11 PM IST

जळगाव- महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरू झाली आहे. या परीक्षेचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथे घडला आहे. पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‌ॅपवर व्हायरल झाली होती.

हेही वाचा- शेवटची इच्छा मालमत्ता अनाथ आश्रमाला द्या!, ठाण्यातील दाम्पत्याची मुलीसह आत्महत्या

कुऱ्हाकाकोडा येथील शिवाजी हायस्कुलमध्ये हा प्रकार घडला असून त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठीचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअ‌ॅपवर व्हायरल झाली. काही तरुणांनी शिक्षकांच्या मदतीने हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. एक तरुण व्हाट्सअ‌ॅपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे परीक्षा केंद्राबाहेर शोधत असताना हा प्रकार उजेडात आला.

शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाचा गवगवा करण्यात येत असताना हा प्रकार घडल्याने परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करुन संबंधित केंद्र संचालक तसेच पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कॉपीचे प्रकार घडतात. हे प्रकार रोखण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.