ETV Bharat / state

विनयभंगाच्या प्रकरणात खडसे खोटं बोलतायत; अंजली दमानियांचा दावा

एकनाथ खडसेंविरोधात मी दाखल केलेल्या विनयभंगाच्या केसची अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अजूनपर्यंत दोषारोपपत्रच दाखल झालेले नाही. त्यामुळे खडसे यातून सुटले कसे, असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

author img

By

Published : Oct 23, 2020, 3:13 PM IST

अंजली दमानिया
अंजली दमानिया

जळगाव - भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज (शुक्रवार) राष्ट्रवादीत दाखल होणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाचा राजीनामा देताना खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल करताना ज्या विनयभंग प्रकरणाचा वारंवार उल्लेख केला. त्याच प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.

खडसेंविरोधात मी दाखल केलेल्या विनयभंगाच्या केसची अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अजूनपर्यंत दोषारोपपत्रच दाखल झालेले नाही. त्यामुळे खडसे यातून सुटले कसे, असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे. खडसे ज्या पद्धतीने माझ्या नावाचा उल्लेख सातत्याने करत आहेत. ते पाहता मी त्यांच्याविरोधात सर्व शक्तीनिशी लढणार आहे, असेही थेट आव्हान दमानियांनी दिले आहे.

एकनाथ खडसे यांनी बुधवारी दुपारी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला. त्यानंतर भाजपा सोडण्याचे कारण स्पष्ट करताना खडसेंनी, आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी नाहक लक्ष्य करत त्रास दिल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी आपल्याविरोधात नेहमी कटकारस्थाने केली. अंजली दमानियांच्या माध्यमातून आपल्यावर विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले. फडणवीस यांनी स्वतः फोन करून पोलिसांवर दबाव आणत तक्रार दाखल केली. म्हणूनच आपण या छळाला कंटाळून भाजपा सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. विनयभंगाच्या प्रकरणात मी लढा दिला. गेल्या आठवड्यातच त्यातून निर्दोष सुटलो, असेही खडसे म्हणाले होते. या साऱ्या घडामोडीनंतर विनयभंग प्रकरणातील तक्रारदार अंजली दमानियांनी त्यांची बाजू मांडली आहे.

नेमकं काय आहे विनयभंग प्रकरण?

या प्रकरणासंदर्भात अंजली दमानिया यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सविस्तर माहिती दिली. 3 सप्टेंबर 2017 रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेत एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात बोलताना अश्लील वक्तव्य केले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांनी खडसेंनी केलेल्या वक्तव्याची चौकशी केली. त्यानंतर 7 सप्टेंबर 2017 रोजी खडसेंच्या त्या कार्यक्रमासंदर्भातील ऑडिओ आणि काही व्हिडिओ अंजली दमानिया यांना मिळाले. त्यात खडसेंनी त्यांच्याबाबतीत अश्लील वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाल्याने, दमानिया यांनी वाकोला पोलीस ठाण्यात खडसे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 509 नुसार अवमानकारक व अश्लील वक्तव्यप्रकरणी तक्रार दाखल केली होती. काही दिवसानंतर ही केस जळगावला शिफ्ट करण्यात आली. त्यानंतर मुक्ताईनगर येथून काही पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईत येऊन तक्रारदार अंजली दमानिया यांचा जबाब घेतला. काही दिवसांनी पुन्हा दमानिया यांचा पुरवणी जबाब घेण्यात आला. अंजली दमानिया यांनी मुंबईतील रे रोड मॅजिस्ट्रेट कोर्टात न्यायाधीशांसमोर जबाब दिला. परंतु, त्यानंतर या प्रकरणात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, असा दमानिया यांचा दावा आहे.

विनयभंग प्रकरणातून खडसे सुटलेले नाहीत - दमानिया
मी दाखल केलेल्या विनयभंगाच्या केसमधून खडसे सुटलेले नाहीत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेले भाषण मी ऐकले. त्यात त्यांनी विनयभंग प्रकरणातून आपण सुटल्याचे म्हटले आहे. परंतु, या प्रकारानंतर मी लगेच पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्याशी संपर्क केला. त्यावर शिंदे यांनी या प्रकरणाशी निगडित सीडी टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत पुढे कारवाई झालेली नाही, अशी माहिती दिली. वरणगाव येथील पोलीस अधिकारी बोरसे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ह्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेले नसल्याची माहिती मला दिल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.

राजकारणाशी देणं-घेणं नाही, माझा लढा भ्रष्टाचाराशी - दमानिया

मला राजकारणाशी कोणत्याही प्रकारचे देणं-घेणं नाही, माझा लढा भ्रष्टाचाराची आहे. मात्र, माझ्या बाबतीत घडलेल्या या प्रकाराचा उपयोग राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात आहे. फडणवीस यांनीदेखील सोयीचे राजकारण केले आहे. खडसेंनी देखील आता हे उद्योग बंद केले नाहीत तर, मी कायदेशीर लढा देईनच, असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.

हेही वाचा - राजकीय वारसदारासाठी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.