ETV Bharat / state

MLA Lata Sonawane : शिवसेनेच्या आमदार लता सोनवणेंचे जात प्रमाणपत्र अवैध; आमदारकी धोक्यात? - लता सोनवणे आमदारकी धोक्यात

आमदार लता सोनवणे (MLA Lata Sonawane) यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध (MLA Lata Sonawane caste Certificate) असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. त्यामुळे आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे.

mla lata sonawane
आमदार लता सोनवणे
author img

By

Published : Feb 16, 2022, 10:05 PM IST

जळगाव - चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार लता चंद्रकांत सोनवणे (MLA Lata Sonawane) यांची आमदारकी धोक्यात आली आहे. टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध (MLA Lata Sonawane Caste Certificate) घोषित केल्याचा निर्णय नंदुरबार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिला आहे.

या आदेशात म्हटले आहे की, सोनवणे यांनी या कागदोपत्री पुराव्याच्या आधारे तसेच आता भाव संबंध परीक्षेच्या आधारे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा अवैध घोषित केला आहे. तसेच त्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केलेले टोकरे कोळी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात येत आहे.

  • काय आहे प्रकरण?

याबाबत जगदीश रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी आमदार लता सोनवणे (MLA Lata Sonawane) यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध (MLA Lata Sonawane caste Certificate) असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. त्यामुळे आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. चोपडा विधानसभेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी टोकरे कोळी या अनुसूचित जमाती तपासणीचा प्रस्ताव कार्यालय अधीक्षक, जळगाव शहर महापालिका यांच्यामार्फत निवडणूक प्रयोजनार्थ १० एप्रिल २०१९ ला समितीस सादर केला होता.

लता सोनवणे यांनी जळगाव मनपा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या देय असलेल्या लाभ घेतल्याने मनपा आयुक्तांनी कारवाई करावी व प्रमाणपत्र तपासणीला कळवावे, असे आदेश उपसंचालक दिनेश तिडके यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.