जळगाव - शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरुन विरोधीपक्ष शिवसेनेने महापालिका इमारतीसमोर साखळी उपोषणास मंगळवारी सुरुवात केली आहे. आज बुधवारी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्यासह भाजपच्या 3 नगरसेवकांनी या उपोषणाला पाठिंबा देत स्वच्छतेचा मक्ता रद्द करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक व उपमहापौर यांनी स्वच्छतेवरून प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत 17 मजली इमारत दाणानून सोडली होती. यानतंर उपायुक्त अजित मुठे यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.
शहरातील प्रभाग क्र.12 मध्ये असलेल्या अस्वच्छतेबाबत मनपाच्या आरोग्य विभागाकडून कुठलेही उपाययोजना होत नसल्याच्या निषेर्धात नगरसेवक अनंत जोशी हे गुरुवारी आत्मक्लेष आंदोलनास बसले होते. दरम्यान, त्यांना स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाकडून उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे जोशींनी आंदोलन मागे घेतले. परंतु, 4 दिवस उलटूनही अस्वच्छतेचा प्रश्न जैसे-थे असल्यामुळे त्यांनी सोमवारी पुन्हा आंदोलन सुरु केले. प्रभागच काय संपूर्ण शहरात ही परिस्थिती असल्याने मगंळवारपासून जोशी यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक देखील आंदोलनात सहभागी झाले. मंगळवारी सत्ताधारी गटाच्या महापौर भारती सोनवणे, स्थायी सभापती शुचिता हाडा व उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी आंदसोलक शिवसेना नगरसेवकांची भेट घेवून आंदोलन मागे घेण्यासाठी मनधरणी देखील केली होती. मात्र, हे आंदोलन सुरु राहिले.
हेही वाचा - गावठी कट्टे बाळगणाऱ्या एकास अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आज बुधवारी शिवसेनेने आंदोलन आणखी तीव्र केले. या साखळी उपोषण आंदोलनात शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, इबा पटेल यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
एकीकडे शिवसेनेच्या आंदोलनाला भाजप नगरसेवकांनी पाठिंबा दिला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या साखळी उपोषणात ‘जळगावकरांची एकच भूल, कमळाचे फूल’ अशा सत्ताधाऱ्यांचा विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. आंदोलनस्थळी ढोल वाजवून प्रशासन व सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न देखील करण्यात आला. शिवसेना नगरसेवकांकडून सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी आज बुधवारी दुपारी 1 वाजता उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी सेनेच्या नगरसेवकांची भेट घेतली. तसेच या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर धीरज सोनवणे व डॉ. चंद्रशेखर पाटील यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला. सदाशिव ढेकळे यांनीही आंदोलकांची भेट घेतली. त्यामुळे एकीकडे महापौर भारती सोनवणे यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानतंर उपहापौर सोनवणे यांनी आंदोलनास पाठींबा दिल्याने भाजपमधील स्वच्छतेच्या प्रश्नावरुन असलेले मतभेद समोर आले आहेत.
उपायुक्त अजित मुठे यांनी शिवसेना नगरसेवकांशी चर्चा केली. तसेच त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आंदोलकांकडून उपायुक्तांना निवेदन दिले. यावेळी उपहामापौर डॉ. आश्विन सोनवणे, नितीन लढ्ढा, सुनील महाजन यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. वॉटरग्रेस कंपनीकडे पुरेसे कामगार नसल्याने त्याचा परिणाम शहराच्या दैनंदिन साफसफाईवर होत आहे. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. 75 कोटींचा ठेका देवून त्या दर्जाचे काम होत नसल्याने हा ठेका रद्द करण्यत यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच तीव्र आंदोनल छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला.
हेही वाचा - एनआरसी, सीएए कायद्याविरुद्ध जळगाव मुस्लिम मंचतर्फे अनोखे आंदोलन; डिटेन्शन कॅम्प उभारत दर्शवला विरोध