ETV Bharat / state

हॉकर्सला व्यवसाय करू द्या, नाहीतर त्यांची मुलं-बाळं दत्तक घ्या; शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून हॉकर्सला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे हॉकर्समध्ये महापालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष आहे. एकीकडे हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा दिल्या जात नसताना कारवाई होत असल्याने, या विषयात आता महापालिकेतील विरोधीपक्ष शिवसेनेने उडी घेतली आहे.

शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा
शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा
author img

By

Published : Sep 3, 2020, 4:41 PM IST

जळगाव - शहरातील हॉकर्सच्या स्थलांतराचा प्रश्न गंभीर झाला आहे. हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा देण्याऐवजी महापालिका प्रशासन हॉकर्सवर कडक कारवाई करत आहे. यामुळे महापालिकेतील विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हॉकर्सच्या विषयासंदर्भात गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी 'हॉकर्सला व्यवसाय करू द्या, नाही तर त्यांची मुलं-बाळं दत्तक घ्या' अशी भूमिका घेत शिवसेनेने प्रशासनाला लक्ष्य केले. या मोर्चात काही हॉकर्स आपल्या मुलाबाळांसह सहभागी झाले होते.

शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्वकाही ठप्प आहे. शहरातील हॉकर्सचा व्यवसाय देखील या काळात बंद होता. आता राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असल्याने व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. अशा परिस्थितीत शहरात व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून हॉकर्सला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे हॉकर्समध्ये महापालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष आहे. एकीकडे हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा दिल्या जात नसताना कारवाई होत असल्याने, या विषयात आता महापालिकेतील विरोधीपक्ष शिवसेनेने उडी घेतली आहे. गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हॉकर्स आणि त्यांची मुलं-बाळं सहभागी झाले होते.

हेही वाचा - नवरात्री उत्सवाच्या गाईडलाइन्स वेळीच जाहीर करा, शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

घोषणाबाजीने दणाणले महापालिकेचे आवर -

मोर्चा महापालिकेवर धडकल्यानंतर त्याठिकाणी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'आम्हाला व्यवसाय करू द्या, अन्यथा आमची मुलं-बाळं दत्तक घ्या', 'आयुक्त साहेब हॉकर्सला व्यवसायासाठी पर्यायी जागा द्या', अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दरम्यान, आयुक्तांनी हॉकर्सच्या स्थलांतराबाबत लवकर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजपवर साधला निशाणा -

हॉकर्सच्या अडचणींसंदर्भात मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेने महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या काळात हॉकर्सच्या अडचणींबाबत कळवळा दाखवणारे आमदार सुरेश भोळे यांना आता मात्र, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. भाजपकडून शहराशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप यावेळी शिवसेनेने केला आहे.

हेही वाचा - ...अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.