ETV Bharat / state

मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावातच शिवसेना विरुद्ध शिवसेना

मंत्री गुलाबराव पाटील यांनी गावातील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरल्याने याठिकाणी शिवसेनेच्या स्वकियांमध्येच लढत रंगली आहे.

jalgaon
jalgaon
author img

By

Published : Jan 15, 2021, 2:53 PM IST

Updated : Jan 15, 2021, 3:05 PM IST

जळगाव - शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसल्याने, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगला आहे. याठिकाणी 'विकास' आणि 'परिवर्तन' असे दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात असून, कोणते पॅनल बाजी मारते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी गावातील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरल्याने याठिकाणी शिवसेनेच्या स्वकियांमध्येच लढत रंगली आहे.

जनमताचा कौल कोणाला?

'खान्देशची मुलुख मैदान तोफ' म्हणून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची राज्यभर ओळख आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून राज्याच्या राजकारणात यशस्वी डावपेच आखण्यात त्यांची हातोटी असल्याचे मानले जाते. परंतु, आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचे डावपेच फसल्याचे पाहायला मिळत आहे. पाळधी बुद्रुक हे गुलाबराव पाटील यांचे मूळगाव आहे. या गावाचाच दुसरा भाग असलेल्या पाळधी खुर्द गावातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या दोन्ही गावांमध्ये गुलाबराव पाटील यांचे म्हणजेच, शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, असे असताना गुलाबराव पाटील यांना पाळधी खुर्दची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता जनमताचा कौल कोणाच्या बाजूने असेल, याची उत्सुकता आहे.

विकासाच्या मुद्द्यावरून गाजतेय निवडणूक

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीत गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शरद कासट यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. यावेळी त्यांना शिवसेनेचेच कार्यकर्ते व गुलाबराव पाटील यांचे समर्थक असलेले दिलीप पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु, त्यात यश आले नाही. 25 वर्षे एकहाती सत्ता असूनही गावाच्या विकासाचा अनुशेष कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करून दिलीप पाटील व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अखेर, याठिकाणी शरद कासट यांनीही उमेदवारी करण्याचे ठरवल्याने स्वकियांमध्येच लढत रंगली आहे.

असा ठरला होता फॉर्म्युला, पण तडजोड करण्यात अपयश

ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून गुलाबराव पाटील यांच्या मध्यस्थीने 17 सदस्यांपैकी दोन्ही गटाचे प्रत्येकी 8 सदस्य आणि एक अपक्षाला संधी द्यावी असा 'फॉर्म्युला' ठरला होता. पण त्यावर तडजोड करण्यात अपयश आल्याने बिनविरोधचे प्रयत्न फसले. आता विकास आणि परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागा लढवल्या आहेत.

विकास आणि परिवर्तन पॅनेलमध्ये रंगलीय लढत

याठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक शरद कासट यांचे विकास पॅनल आहे. तर शिवसेनेचे कार्यकर्ते व गुलाबराव पाटील यांचे समर्थक दिलीप पाटील यांचे परिवर्तन पॅनल रिंगणात आहे. गेल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत गावाचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला भर राहिला आहे. यापुढेही तोच अजेंडा असून, गावाला शहरीकरणाच्या वाटेवर नेण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचा दावा शरद कासट यांनी केला. तर, गेल्या 25 वर्षांच्या काळात गावाचा विकास झाला नाही. आजही गावात मूलभूत सुविधा नाहीत. विकासासाठी निधी मिळतो, पण भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारामुळे विकासकामे होत नसल्याचा आरोप करत परिवर्तन पॅनलचे प्रमुख दिलीप पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. आता कोणाच्या पारड्यात किती जागा मिळतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Jan 15, 2021, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.