ETV Bharat / state

Sharad Pawar in Jalgaon: राष्ट्रवादीच्या नेत्यांची पंतप्रधान मोदींनी चौकशी करावी, पण...शरद पवारांचे मोठे वक्तव्य - शरद पवार मोदी टीका

sharad pawar in jalgaon 9 वर्षात मोदींनी काय केलं आहे? राष्ट्रवादी व शिवसेना फोडली आहे? देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केलीय.

sharad pawar in jalgaon
sharad pawar in jalgaon
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 4:44 PM IST

Updated : Sep 5, 2023, 5:57 PM IST

जळगाव sharad pawar in jalgaon - खान्देशाचा इतिहास स्वाभिमानाचा इतिहास आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. धरणात पाणी कमी आहे. चुकीच्या हातात देशाचं राज्य गेलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. ते जळगावमध्ये जाहीर सभेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार म्हणाले, माझं भाग्य असं की, मला या जिल्ह्यात काम करायची संधी मिळाली होती. या राज्याचे चित्र बदलायला खान्देशची भूमिका महत्त्वाची आहे. जळगावची केळी प्रसिद्ध आहे. उत्तम शेतीचा आदर्श पाहायला मिळत आहे. धरणात पाणी कमी आहे. पिके आता गेली आहेत. ही स्थिती बदलायची आहे. वेळ लागेल, पण खात्रीनं बदलेल. चुकीच्या लोकांच्या हातात देशाचे राज्य गेले आहे. जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. हळूहळू लोक वाढत गेले. त्यात काही लाख लोक जमले होते.

  • खान्देशी बाण्याने कष्टकरी महाराष्ट्राचा आवाज दिल्लीच्याही तख्ताला आज ऐकू जाणार...!
    आज संत बहिणाबाईंच्या कर्मभूमीवर आदरणीय पवार साहेबांच्या साथीने स्वाभिमानाचा निर्धार होणार..!
    जळगाव येथे आयोजित 'स्वाभिमान सभा' यासाठी लाभलेले सर्वसामान्य लोकांचे, कार्यकर्त्यांचे प्रेम, आर्शीवाद… pic.twitter.com/N0FZB0DsJg

    — NCP (@NCPspeaks) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील आरोपांची पंतप्रधान मोदींनी चौकशी करावी- देशाचे पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. माझे आवाहन आहे, त्यांनी चौकशी करावी. चुकीचे असेल तर शिक्षा करा. जर चुकीचे नसेल तर तुम्ही काय शिक्षा घेणार तेदेखील देशाला सांगा. सत्तेचा गैरवापर करून शेतकरी, मजूर आणि आई-बहिणीवर लाठीहल्ला केला जात आहे. त्यात 100 टक्के बदल करायचा आहे. त्याला तुम्ही साथ द्यावी, ही विनंती, असं यावेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटलयं.

शेतकरी काही मागत नाही, तो मालाची किंमत मागतोय. त्यासाठी तो संघर्ष करू शकतो. अनेकांना भाजपानं तुरुंगात टाकले. भाजपनं सत्तेचा गैरवापर केला आहे-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

लोकसभेचे शिवधनुष्य पेलावं-जयंत पाटील- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, कापसाला भाव नाही. कापसाचा पन्नास टक्के भाव कमी झालाय. जेवढा खर्च झाला, तेवढा सुद्धा खर्च निघणार नाही. मोसंबीपासून मिळणारे 58 टक्के उत्पन्न कमी झाले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो, असे सांगितले. पण, तसे झाले नाही. नाथाभाऊ खडसे हे पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून काम करत आहेत. नाथाभाऊ तुम्हीच या लोकसभेचे शिवधनुष्य तुम्हीच उचललं पाहिजे. या जिल्ह्यात तुम्हीच शिवधनुष्य उचलून पूर्ण करा. जास्तीत जास्त आमदारसुद्धा निवडून आणा. यापूर्वी तुम्ही दोन खासदार निवडून आणले आता तुम्हीच हे लोकसभेचे शिवधनुष्य पेलावं, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

हेही वाचा-

  1. President of Bharat invitation: देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे? शरद पवारांचा सवाल
  2. Sharad Pawar On Maratha Reservation : ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण द्या, शरद पवारांनी सुचवला 'हा' तोडगा
  3. Nana Patole On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्यास कोण जबाबदार? नाना पटोलेंनी थेटच सांगितलं...

Last Updated : Sep 5, 2023, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.