ETV Bharat / state

'मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईला'

author img

By

Published : Feb 15, 2020, 9:22 PM IST

आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट काळ सुरू आहे. शेती, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रचंड मंदी आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. बेरोजगारी वाढत चालली आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

sharad-pawar-criticize-on-modi-government-in-jalgoan

जळगाव- आम्ही सत्तेत आल्यावर 6 महिन्यांत देशातील चित्र बदलू, असे सांगत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु, 6 वर्षे उलटली. आधी होती त्यापेक्षा विदारक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. पुढे अजून काय होईल, ते सांगता येत नाही. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

बोलताना शरद पवार...

हेही वाचा- 'देशात कुठेही सीएए, एनआरसी आणि एनपीआरची अंमलबजावणी होऊ देणार नाही'

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आखतवाडे-वेले येथे शनिवारी चोपडा तालुका सहकारी सुतगिरणीचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला कामगार तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार सुरेश पाटील, सतीश पाटील, दिलीप सोनवणे, तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील, व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील, तहसीलदार अनिल गावीत आदी उपस्थित होते.

अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट काळ सुरू
आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात वाईट काळ सुरू आहे. शेती, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रचंड मंदी आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. बेरोजगारी वाढत चालली आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. महाराष्ट्रात असाच बदल करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. केंद्र सरकारचा दृष्टिकोन वेगळा आहे. केंद्र सरकार राज्याला करत असलेली मदत राजकीय आहे. ती जेवढी व्हायला हवी तेवढी होत नाही. देशातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत कशी जास्त मिळेल, तो जास्त कसे पिकवेल आणि खाणाऱ्यांची गरज कशी भागेल? असा दुहेरी कार्यक्रम राबविण्याची आज गरज आहे.

शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजनांची गरज

आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी हिताची धोरणे राबवली जात नाहीत. शेतकऱ्याला सहन होत नसल्यानेच तो आत्महत्या करत आहे. जीव देणे सोपे नाही. आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून तो टोकाचा निर्णय घेत आहे. म्हणून आता ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जास्तीत जास्त हातांना काम हवे
अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर कृषी, उद्योग-व्यवसाय, सार्वजनिक दळणवळण अशा क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवली पाहिजे. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले तर शेतकऱ्यांचे निम्मे प्रश्न सुटतील. शेतीमालाला चांगली बाजारपेठ मिळायला हवी. त्यासाठी दळणवळणाची उत्तम साधने हवीत, चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात. याच व्यवस्थेवर भांडवली गुंतवणूक वाढली तर अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यास मदत होते, असेही पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.