ETV Bharat / state

धक्कादायक ! जळगावात ऑक्सिजन वायूसाठी कार्बन डायऑक्साईडच्या सिलिंडर्सची विक्री - जळगाव जिल्हा न्यूज अपडेट

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या-औषधी तसेच आरोग्य साधन सामग्रीची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे काही व्यवसायिक कोरोनाला व्यवसायिक संधी मानून रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. असाच काहीसा प्रकार जळगावात सुरू आहे. याठिकाणी ऑक्सिजन वायू भरण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरऐवजी चक्क कार्बन डायऑक्साईडच्या सिलिंडर्सची सर्रास विक्री सुरू आहे.

जळगावात ऑक्सिजन वायूसाठी कार्बन डायऑक्साईडच्या सिलिंडर्सची विक्री

author img

By

Published : May 4, 2021, 7:40 PM IST

जळगाव - कोरोना महामारीच्या काळात रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या-औषधी तसेच आरोग्य साधन सामग्रीची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे काही व्यवसायिक कोरोनाला व्यवसायिक संधी मानून रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. असाच काहीसा प्रकार जळगावात सुरू आहे. याठिकाणी ऑक्सिजन वायू भरण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरऐवजी चक्क कार्बन डायऑक्साईडच्या सिलिंडर्सची सर्रास विक्री सुरू आहे. सेवाभावी कार्य करणाऱ्या एका प्राध्यापकाच्या बाबतीत घडलेल्या घटनेवरून हा प्रकार समोर आला आहे.

शहरातील अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्याबाबत प्रा. डॉ. लेकुरवाळे यांनी थेट मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, हा प्रकार घडल्यानंतर, आठवडाभराचा कालावधी उलटून देखील संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलंय?

कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्याची सर्वत्र समस्या आहे. ही समस्या लक्षात घेऊन रुग्णांना मदत करण्यासाठी भुसावळातील काही प्राध्यापकांनी एकत्र येत 'ऑक्सिजन ग्रुप' नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपसाठी प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी जळगावातील छाबडा एजन्सीकडून सहा ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतले. त्यातील चार रिकामे होते. ते भरण्यासाठी ते संबंधित फॅक्टरीत गेले. तेथील लोकांनी त्यांना हे सिलिंडर कार्बनडाय ऑक्साईडचे असून त्यात ऑक्सिजन भरल्यास स्फोट होऊ शकतो, असे सांगत ते सिलिंडर भरून द्यायला नकार दिला. त्यामुळे प्रा. लेकुरवाळे यांनी ते सिलिंडर एजन्सीला परत केले. त्यावेळी मात्र, शासकीय आदेशानेच हे सिलिंडर वापरले जात असल्याचे छाबडा एजन्सीकडून त्यांना सांगण्यात आले. या मुद्द्यावरून एजन्सी चालक आणि लेकुरवाळे यांच्यात शाब्दिक चकमक देखील उडाली. ऑक्सिजन वायू भरण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईड सिलिंडरचा वापर करणे तांत्रिकदृष्ट्या घातक असताना एजन्सी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे प्रा. लेकुरवाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत झालेले आरोप संबंधित एजन्सी चालकाने फेटाळून लावले. आजवर कुठल्याही प्रकारची दुर्घटना झालेली नाही. शासकीय परिपत्रकानुसार आम्ही सिलिंडर पुरवठा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगावात ऑक्सिजन वायूसाठी कार्बन डायऑक्साईडच्या सिलिंडर्सची विक्री

आरोग्य सेवा संचालनालयाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ?

राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या वतीने 30 मे 2020 ला एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात केंद्र सरकारच्या एका सूचना पत्राचा संदर्भ आहे. ऑक्सिजन सिलिंडर कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या डीलर्सला, त्यांच्या जवळील सिलिंडर राखीव ठेवून जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार औद्योगिक सिलिंडर्सला वैद्यकीय सिलिंडरमध्ये रुपांतरीत करून त्यांचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यात कुठेही कार्बन डाय ऑक्साईडच्या सिलिंडरचा उल्लेख नाही. मात्र, तोच संदर्भ देऊन हे सिलिंडर विकले जात असल्याचे समोर आले आहे.

असे आहेत दोन्ही सिलिंडरमधील फरक

तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्बनडाय ऑक्साईडच्या सिलिंडरमध्ये कमी घनतेने तो वायू भरला जातो. त्यामुळे त्याचा पत्रा तुलनेने बारीक असतो. ऑक्सिजन जास्त घनतेने आणि जास्त दाबाने भरला जात असल्यामुळे ते सिलिंडर जाड असते. ऑक्सिजनचे सिलिंडर हे सव्वा पाच फुटाचे आणि काळ्या रंगाचे असते, नॉब व्हॉलचा आतील व्यास 2 सेंटीमीटर असतो. तर कार्बन डाय ऑक्साईड सिलिंडर तुलनेने कमी उंचीचे आणि लाल रंगाचे असते. त्याच्या नॉब व्हॉलचा आतील व्यास 1 सेंटीमीटरचा असतो. या सिलिंडरमध्ये आधीचा कार्बनडाय ऑक्साईड थोडाही शिल्लक असेल तर ऑक्सिजनशी त्याचा संपर्क होऊन स्फोट होण्याची शक्यता असते. शिवाय सिलिंडरमध्ये राहिलेला कार्बनडाय ऑक्साईड रुग्णाला दिला गेल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो.

पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

या प्रकाराबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. चौकशीत काही चुकीचा प्रकार आढळला तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराबाबत आपल्याकडे तक्रार आली असून, संबंधितांना नोटीस बजावली आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा - नागपुरात साडे तीनशे इंटर्न डॉक्टर्स संपावर; कोविड भत्त्यासह विविध सोयी सुविधांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.