ETV Bharat / state

कोरोनाशी लढा; मास्क निर्मितीतून बचतगटाच्या महिलांना रोजगार, कठीण परिस्थितीवर 'अशी' केली मात

author img

By

Published : Apr 25, 2020, 11:58 AM IST

साईधन एंटरप्राईजेस ही संस्था बचतगटाच्या महिलांसाठी काम करते. धनंजय कीर्तने आणि अनिता कीर्तने हे संस्थेचे कामकाज सांभाळतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो बचतगटाच्या महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.

km
मास्क बनवताना महिला

जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभारात 3 मेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग व व्यवसाय ठप्प आहेत. बचतगटाच्या महिलांच्या हाताला काम नसल्याने साईधन एंटरप्राईजेसने कापडी मास्क निर्मितीच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे, दर्जेदार कापडी मास्क 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

कोरोनाशी लढा; मास्क निर्मितीतून बचतगटाच्या महिलांना रोजगार, कठीण परिस्थितीवर 'अशी' केली मात

जळगावातील साईधन एंटरप्राईजेस ही संस्था बचतगटाच्या महिलांसाठी काम करते. धनंजय कीर्तने आणि अनिता कीर्तने हे संस्थेचे कामकाज सांभाळतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो बचतगटाच्या महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना सर्वाधिक फटका अलीकडच्या काळात सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत बचतगटाच्या महिलांसाठी काय करता येईल, या विचारातून कीर्तने दाम्पत्याने पाऊल टाकले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. बाजारात दर्जेदार मास्कचा तुटवडा भासत आहे. म्हणून आपणच मास्क निर्मिती केली तर कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा उचलता येईल, शिवाय बचतगटाच्या महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल. म्हणून त्यांनी मास्क निर्मिती करण्याचे ठरवले.

100 ते 125 महिलांना मिळाला रोजगार

कीर्तने दाम्पत्याने काही बचतगटांच्या महिलांना आपल्या संकल्पनेची माहिती दिली. रोजगाराच्या शोधात असलेल्या महिला लगेच स्वतःहून पुढे आल्या. सद्यस्थितीत सुमारे 100 ते 125 महिला मास्क निर्मिती करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हा उपक्रम सुरू आहे. एकाच ठिकाणी गर्दी नको म्हणून महिलांच्या बॅच करण्यात आल्या आहेत. एका दिवसाला एक महिला सुमारे शंभरावर मास्क तयार करते. त्या माध्यमातून त्या संबंधित महिलेला 200 ते 250 रुपये रोजगार मिळतो. थ्री लेअरचे कापडी मास्क दर्जेदार असल्याने बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे. बचतगटाच्या महिलांना डोळ्यासमोर ठेवून राबवलेल्या साईधन एंटरप्राइजेसच्या संकल्पनेचे कौतुक होत आहे.

महिलांच्या चेहऱ्यावर समाधान

कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. जळगाव शहरात शेकडो कुटुंबांचे अर्थकारण रिक्षा व्यवसाय, हमाली, छोटे-मोठे उद्योग यावर अवलंबून आहे. अशा कुटुंबातील अनेक महिला बचतगटाच्या माध्यमातून हाताला मिळेल ते काम करून संसाराला हातभात लावतात. मात्र, अलीकडे काम नसल्याने त्यांच्याही अडचणी वाढल्या होत्या. अशातच कीर्तने दाम्पत्याने त्यांच्यासाठी नवी वाट शोधली. कोरोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या काळात रोजगार मिळाल्याने या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.