ETV Bharat / state

महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर १० लाखांचा गुटखा जप्त; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई - Gutkha Traffic News Satrasen Jalgaon

मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जाणारा सुमारे १० लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अटक केलेले आरोपी व जप्त केलेल्या गुटख्यासह चोपडा ग्रामीण पोलीस
author img

By

Published : Nov 3, 2019, 2:33 PM IST

जळगाव- मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जाणारा सुमारे १० लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सिमेवर असलेल्या चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

अटक केलेले आरोपी व जप्त केलेल्या गुटख्यासह चोपडा ग्रामीण पोलीस

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या सत्रासेन गावाजवळ मध्यप्रदेशातून अवैधरित्या आणला जाणारा सुमारे १० लाख रुपयांचा गुटखा चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. एका मिनी ट्रकमधून वाहतूक करून आणलेल्या या गुटख्याचा पंचनामा करून तो जळगाव इथल्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकास अटक केली आहे.

चोपडा ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात गुटखा आणणारा वाहन चालक अडकला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत अजून कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा- मुसळधार पावसामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील पूल गेला वाहून; वाकोदचा तुटला संपर्क

Intro:जळगाव
मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जाणारा सुमारे 10 लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचा सीमेवर असलेल्या चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.Body:जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या सत्रासेन गावाजवळ मध्यप्रदेशातून अवैधरित्या आणण्यात असलेला सुमारे 10 लाख रुपयांचा गुटखा चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. एका मिनी ट्रकमधून वाहतूक करून आणलेल्या या गुटख्याच्या पंचनामा करून जळगाव इथल्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकास अटक केली आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांना खबऱ्याकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात गुटखा आणणारा वाहन चालक अडकला.Conclusion:दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत अजून कुठलाही गुन्हा दाखल केलेला नसल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.