जळगाव - अमृता फडणवीस यांनी कायम महाराष्ट्र राज्य , महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र प्रशासन यांच्यांबद्दल द्वेष व्यक्त केला. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये स्वत: बद्दलच द्वेष निर्माण करण्यासाठी खतपाणी घातल्याचा टोला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे. त्या जळगावातील तक्रारींच्या जनसुनावणीनंतर माध्यमांशी बोलत होत्या.
जळगावात तक्रारींच्या जनसुनावणीसाठी आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ( Chairperson of State Womens Commission ) रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा ( Rupali chakankar slammed Amruta Fadnavis ) खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, अडचणीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला सोडून विरोधकांनी ( Rupali chakankar oppositon party in Maharashtra ) राजकारण केले. हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेले नाही. त्यामुळे अमृता फडणवीसांना त्या याच महाराष्ट्रातील असल्याची जनता आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा-Nashik Budget : नाशिक महापालिकेचा २२१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही!
जनतेच्या मनात कायम आठवण राहिल
कोरोना कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्य सुविधा द्याव्यात, यासाठी किमान विरोधकाची भूमिका असायला हवी होती. राजकारण बाजूला ठेवून विरोध बाजूला ठेवून केंद्र सरकारकडून त्यांनी मदत मागायला हवी होती. हे काहीच न करता पूर्ण कालावधीमध्ये विरोधकाची भूमिका राहिली. मात्र हे न करता ते राजकारण करत राहिले. पण ते विसरून गेले की आपण याच महाराष्ट्रमधून आहोत. आज याठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेमुळे आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीच्या काळात मदत करण्याचे सोडून विरोधाचे राजकारण केले. हे जनतेच्या मनात कायम आठवण म्हणून रुजले आहे.
हेही वाचा-Praveen Kumar Sobti Passed Away : महाभारतातील भीम प्रवीण कुमार सोबती यांचे निधन
वाईन विक्रीला महिलांची तक्रार आल्यावर विचार करू
राज्यभरात सुपर शॉप तसेच मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यात येणार आहे. यावर चाकणकर म्हणाल्या, की महिला आयोग म्हणून आमच्याकडे या संदर्भात विशेष म्हणजे एकाही व्यक्तीची तक्रार महाराष्ट्रातून आलेली नाही. आर्थिक तिजोरी आणि महाराष्ट्र शासन या सगळ्या बाबतीत विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तो मला योग्य निर्णय वाटतो. याबाबत महिलांच्या तक्रारी आल्या व महिलांनी काही मते मांडली तर आपण निश्चितपणे विचार करू.
हेही वाचा-Supriya Sule Attack on PM : मी पंतप्रधान मोदींवर नाराज नाही, मात्र हैराण -सुप्रिया सुळे
पंतप्रधान मोदींचे भाषण हे निवडणुकीतील प्रचारप्रमुखासारखे-
महाराष्ट्र कोरोना विरोधातील लढाई लढत होता. त्यावेळी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवेबाबत असतील किंवा आर्थिक बाबतीत केंद्र सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. महाराष्ट्राबाबत सातत्याने केंद्र सरकार दुजाभावाने वागत आला आहे. मात्र, महाराष्ट्र लढला आणि जिंकलासुद्धा आहे. संसदेत भाषण करतांना पंतप्रधान मोदी हे विसरतात की देशाचे पंतप्रधान आहेत. ते एका पक्षाचे नाहीत. ते निवडणुकीचे प्रचारप्रमुख म्हणून उभे राहिले असे क्षणभर महाराष्ट्राला वाटले. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आणि महाराष्ट्राची जनता याविरोधात आपला राग व्यक्त करत असल्याचेही रुपाली चाकणकर यावर बोलताना म्हणाल्या.
एकनाथ खडसेंची पाठराखण
अंजली दमानियांनी खडसेंवर विनयभंगाच्या केलेल्या तक्रारींवर विचारले असता आपण माहिती गोळा करणार आहोत. आपण माहिती झाल्यानंतर योग्य ती कारवाई करू असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्यांवर थेट गुन्हे दाखल करणार
एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पुन्हा महिलांविषयी जर आक्षेपार्ह वक्तव्य केले तर त्यांच्यावर तो राजकीय पुढारी असो किंवा इतर कोणत्याही व्यक्ती विरोधात थेट महिला आयोग गुन्हा दाखल करेल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. क्तव्य केल्यानंतर माफी मागण्याची वेळ येऊच नये. त्यामुळे बोलणाऱ्याने आपल्या तोंडावर किंवा जिभेला लगाम लावावा, असा कडक इशाराही चाकणकर यांनी दिला.