ETV Bharat / state

'रोटरी क्लब'च्या बाजारात जळगावकरांना मिळतोय सुरक्षित भाजीपाला

बाजारात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात भाजीपाला, फळे उपलब्ध असल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला, फळे खरेदी करावे लागत आहे. मात्र, रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने शेतकऱ्यांना वाजवी दरात भाजीपाला व फळ उपलब्ध होणार आहे.

rotary vgetable market
रोटरी क्लब बाजार
author img

By

Published : Apr 9, 2020, 9:09 PM IST

जळगाव- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे, शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाली असून शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. यामुळे, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर 'रोटरी सुरक्षित बाजार' भरवला आहे.

माहिती देताना राेटरीचे प्रकल्प प्रमुख डॉ. राजेश पाटील

रोटरी सुरक्षित बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून वाजवी दरात भाजीपाला, फळे मिळत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. हा बाजार लॉकडाऊन असेपर्यंत दररोज सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या बाजारात ग्राहकांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून वाजवी दरात भाजीपाला मिळत असल्याने शहरातील अनेक जण येथे भाजीपाला तसेच फळे खरेदीसाठी हजेरी लावत आहेत.

दरम्यान, बाजारात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात भाजीपाला, फळे उपलब्ध असल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला, फळे खरेदी करावे लागत आहे. मात्र, रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने शेतकऱ्यांना वाजवी दरात भाजीपाला व फळ उपलब्ध होणार आहे. या बाजाराच्या माध्यमातून रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने बचतगटातील १४ महिलांनाही काम उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमासाठी रॉटरीचे प्रकल्प प्रमुख डॉ. राजेश पाटील, सहप्रकल्प प्रमुख रमण जाजू, रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष सुशीलकुमार राणे, मानद सचिव सुनील सुखवानी, अरुण नंदश्री, महेश सोनी, सरिता खाचने, अंकित जैन, सागर मंधान, शैलेश चव्हाण यांच्यासह ३५ रोटरीयन्सचे सहकार्य मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी

शहरातील मायादेवी नगरातील रोटरी भवनात हा बाजार भरला आहे. रोटरी भवनाच्या प्रवेशद्वारापासून ते बाहेर पडेपर्यंत प्रत्येक ग्राहकाची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रवेशद्वारावर हात धुवूनच ग्राहकाला आत सोडले जाते. त्यानंतर रोटरी भवनाच्या हॉलमध्ये प्रत्येक ग्राहकाचे स्क्रिनिंग, सॅनिटायझिंग करून सुरक्षित अंतर ठेवत ग्राहकांना खुर्चीवर बसवले जाते. ज्यांना मास्कची गरज आहे, त्यांना स्वस्त दरात मास्क पुरवले जाते. त्यानंतर ग्राहकाला टोकन देऊन नंबरप्रमाणे भाजीपाला खरेदीसाठी आत सोडले जाते. भाजीपाला खरेदीनंतरही प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी सॅनिटायझिंग करूनच सभागृह आवाराच्या बाहेर सोडण्यात येते.

रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टमध्ये ग्राहकांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच ठिकाणी मिळत असल्याने गृहिणींची सोय झाली आहे. दरम्यान, रोटरीचा सुरक्षित बाजाराचा हा पॅटर्न आता शहरातील इतर स्वयंसेवी संस्था तसेच संघटनांनी देखील राबविण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा- नियतीचा असाही खेळ...भुकेलेल्यांना अन्नदान करून घरी परतणाऱ्या दोघांचा अपघाती मृत्यू!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.