ETV Bharat / state

जळगावातील बहुतांशी मतदारसंघांमध्ये बंडखोरी; माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार

ऐनवेळी तिकीट नाकारल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. आज अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. माघारीनंतरच जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जळगावातील बहुतांशी मतदारसंघांमध्ये बंडखोरी
author img

By

Published : Oct 7, 2019, 9:58 AM IST

जळगाव - विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेत युती झाल्याने अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. त्याचप्रमाणे ऐनवेळी तिकीट नाकारल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. आज अर्ज माघारीची मुदत आहे. माघारीनंतरच जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जळगावातील बहुतांशी मतदारसंघांमध्ये बंडखोरी

चाळीसगाव मतदारसंघात भाजपच्या सर्वाधिक तीन बंडखोरांचा समावेश आहे. त्यात डॉ. विनोद कोतकर, डॉ. संजय पाटील आणि डॉ. अविनाश कर्पे यांचा समावेश आहे. भाजपकडून इच्छुक असल्याने मुलाखती देणाऱ्या या तिघांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघात भाजपकडून युवा कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याचप्रमाणे चोपडा मतदारसंघात युतीत बंडखोरी झाली आहे. युतीच्या फॉर्म्युल्यात सेनेला ही जागा सुटल्याने तिथे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाकर सोनवणे यांना सेनेच्या एका गटाचा पाठिंबा मिळत आहे. त्याचप्रमाणे २०१४ च्या निवडणुकीत अल्पमतांनी पराभव झालेल्या राष्ट्रवादीच्या माधुरी पाटील यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली आहे.

हेही वाचा - 'युती'मध्ये तडजोड केली, पण महाराष्ट्रासाठी - उद्धव ठाकरे

पाचोरा मतदारसंघातही भाजपकडून इच्छुक असलेले अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सेनेविरुद्ध बंडखोरी केली आहे. भाजपचा एक मोठा गट आपल्याला पाठिंबा देत असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. भुसावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे किशोर घुले यांनी आघाडीच्या उमेदवारासमोर अपक्ष अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. तर डॉ. मधू मानवतकर यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून भाजपसमोर बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार संजय सावकारे तर आघाडीकडून जगन सोनवणे रिंगणात आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र विशाल देवकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली आहे. तर भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून युतीच्या विरोधात बंडखोरी केली आहे. पारोळ्यात गोविंद शिरोडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून युतीचे उमेदवार चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध बंडखोरी केली आहे.

हेही वाचा - भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जणांचा मृत्यू

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंना यावेळी खडसेंच्या जागी भाजपने मुक्ताईनगर मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला आहे. मात्र, तरीही याठिकाणी सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना विरोध म्हणून त्यांच्या कन्येविरोधात अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. निवडणूक कार्यक्रमात अर्ज माघारीसाठी आज (सोमवारी) अंतिम मुदत आहे. विहित मुदतीत कोण अर्ज माघारी घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माघारीनंतर लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Intro:जळगाव
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेत युती झाल्याने अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढविण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. त्याचप्रमाणे ऐनवेळी तिकीट नाकारल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. उद्या अर्ज माघारीची मुदत आहे. माघारीनंतरच जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.Body:चाळीसगाव मतदारसंघात भाजपच्या सर्वाधिक तीन बंडखोरांचा समावेश आहे. त्यात डॉ. विनोद कोतकर, डॉ. संजय पाटील आणि डॉ. अविनाश कर्पे यांचा समावेश आहे. भाजपकडून इच्छुक असल्याने मुलाखती देणाऱ्या या तिघांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघात भाजपकडून युवा कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याचप्रमाणे चोपडा मतदारसंघात युतीत बंडखोरी झाली आहे. युतीच्या फॉर्म्युल्यात सेनेला ही जागा सुटल्याने तिथे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाकर सोनवणे यांना सेनेच्या एका गटाचा पाठिंबा मिळत आहे. त्याचप्रमाणे २०१४ च्या निवडणुकीत अल्पमतांनी पराभव झालेल्या राष्ट्रवादीच्या माधुरी पाटील यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल करून राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली आहे.

पाचोरा मतदारसंघातही भाजपकडून इच्छुक असलेले अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सेनेविरुद्ध बंडखोरी केली आहे. भाजपचा एक मोठा गट आपल्याला पाठिंबा देत असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. भुसावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे किशोर घुले यांनी आघाडीच्या उमेदवारासमोर अपक्ष अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. तर डॉ. मधू मानवतकर यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून भाजपसमोर बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार संजय सावकारे तर आघाडीकडून जगन सोनवणे रिंगणात आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र विशाल देवकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली आहे. तर भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून युतीच्या विरोधात बंडखोरी केली आहे. पारोळ्यात गोविंद शिरोडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून युतीचे उमेदवार चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध बंडखोरी केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंना यावेळी खडसेंच्या जागी भाजपने मुक्ताईनगर मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला आहे. मात्र, तरीही याठिकाणी सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना विरोध म्हणून त्यांच्या कन्येविरोधात अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.Conclusion:निवडणूक कार्यक्रमात अर्ज माघारीसाठी सोमवारी अंतिम मुदत आहे. विहित मुदतीत कोण अर्ज माघारी घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माघारीनंतर लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.