ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात बंडखोरीमुळे बदलणार राजकीय समीकरणे

जळगावात विविध पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

जळगावात बदलणार राजकीय समीकरणे
author img

By

Published : Oct 7, 2019, 11:44 PM IST

जळगाव - उमेदवारांच्या बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. यात चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा या मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनाही बंडखोरांचा ताप सहन करावा लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मुक्ताईनगर मतदारसंघात अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजप-सेना युती असताना एकनाथ खडसेंच्या कन्या व भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसेंविरोधात सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

हेही वाचा - भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. रवींद्र पाटील यांनी माघार घेत चंद्रकांत पाटलांना छुपा पाठींबा दिला आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मागील निवडणूकीत एकनाथ खडसेंना जोरदार टक्कर देणारे चंद्रकांत पाटील यावेळी देखील रोहिणी खडसेंची वाट बिकट करतील, असा अंदाज आहे.

चोपडा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी-

चोपडा मतदारसंघात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी दिसून आली. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जगदीश वळवींविरुद्ध अपक्ष उमेदवार माधुरी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्याचप्रमाणे सेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरोधात भाजपचे अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी केली.

पाचोऱ्यात किशोर पाटलांना शिंदेंचे आव्हान-

पाचोरा विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये बंडखोरी झाली आहे. शिवसेनेचे किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

Intro:जळगाव
बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बंडखोरीचा सर्वाधिक फटका युतीच्या अधिकृत उमेदवारांना बसणार आहे. त्यात चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा या मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. युतीप्रमाणे आघाडीच्या उमेदवारांनाही बंडखोरांचा ताप सहन करावा लागणार आहे.Body:माघारीच्या दिवशी मुक्ताईनगर मतदारसंघात अनपेक्षित हालचाली घडल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि सेनेत युती असताना याठिकाणी एकनाथ खडसेंच्या कन्या तथा भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसेंविरोधात सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ऍड. रवींद्र पाटील यांनी माघार घेत चंद्रकांत पाटलांना छुपा पाठींबा दिला आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंविरोधात चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. गेल्या वेळी एकनाथ खडसेंना जोरदार टक्कर देणारे चंद्रकांत पाटील यावेळी देखील रोहिणी खडसेंची वाट बिकट करतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

चोपडा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी-

चोपडा मतदारसंघात भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी दिसून आली. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जगदीश वळवींविरुद्ध अपक्ष उमेदवार माधुरी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्याचप्रमाणे सेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरोधात भाजपचे अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांची बंडखोरी आहे.Conclusion:पाचोऱ्यात किशोर पाटलांना शिंदेंचे आव्हान-

पाचोरा विधानसभा मतदारसंघात युतीत बंडखोरी झाली आहे. याठिकाणी शिवसेनेचे किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपचे अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.