ETV Bharat / state

रावेरमध्ये एकनाथ खडसेंचे वर्चस्व कायम, काँग्रेसच्या उल्हास पाटलांना धक्का देत रक्षा खडसे विजयी

रावेर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपच्या रक्षा खडसे या निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांना अस्मान दाखवत पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथ खडसेंचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.

रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे विजयी
author img

By

Published : May 25, 2019, 3:43 PM IST

जळगाव - रावेर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपच्या रक्षा खडसे या निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांना अस्मान दाखवत पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथ खडसेंचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. दुसरीकडे या मतदारसंघात विरोधकांना सतत अपयश येत असल्याने त्यांच्यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारा ठरणार आहे.

बुथरचनेपासून भाजपचे तगडे संघटन आणि वैयक्तिक जनसंपर्क, मोदी फॅक्टर तसेच माजी मंत्री एकनाथ खडसेंचा मतदारसंघावरील प्रभाव, या त्रिसूत्रीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसेंचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला. या निवडणुकीत वाढलेले तरुणांचे मतदानही भाजपच्या पारड्यात पडल्याने २०१४ च्या तुलनेत यावर्षी त्यांचे मताधिक्य ४९ हजार ९३४ ने वाढून ३ लाख ३५ हजार ८८२ वर पोहोचले. रावेर लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जबरदस्त प्रभाव आहे. नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर असलेली भाजप-सेनेची सत्ता तसेच भाजपकडे असलेल्या प्रचाराची सक्षम यंत्रणा रक्षा खडसे यांच्यासाठी मदतीची ठरली. या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस की राष्ट्रवादीकडे हा तिढा शेवटपर्यंत सुरु होता.

राष्ट्रवादीने मराठा पाटील समाजाच्या उमेदवाराचे नावही जवळपास निश्चित केले होते. मात्र, काँग्रेसने अखेरपर्यंत दावा कायम ठेवून ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली. अखेरच्या क्षणाला डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. या तुलनेत रक्षा खडसे यांचे भाजपच्या पहिल्याच यादीत नाव आल्याने त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी नव्हती. तर दुसरीकडे खासदार रक्षा खडसे यांच्या मागील टर्ममध्ये मतदारसंघातील प्रत्येक गावात जनसंपर्क वाढल्याने कार्यकर्त्यांची मजबूत फळी होती. त्याचा लाभ त्यांना झाला. रावेर लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाच्या तुलनेत एकट्या रक्षा खडसेंना तब्बल ५९.९६ टक्के मतदान झाले. रावेर लोकसभा मतदारसंघात पूर्वी काँग्रेसची ताकद चांगली होती. परंतू, काँग्रेसच्या नेत्यांनी काळाची पावले न ओळखल्याने भाजपने हा मतदारसंघ काबीज केला. उल्हास पाटलांचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे व डॉ. उल्हास पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. दोन्ही उमेदवार हे लेवा समाजाचे असल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन मराठा, गुर्जर, माळी, बौद्ध आदी समाज निर्णायक ठरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एकनाथ खडसेंचे मतदारसंघावर असलेले वलय पाहता सर्व समाज रक्षा खडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय असलेल्या उल्हास पाटलांची ताकद याठिकाणी कमी पडली. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसची मते विभागली गेली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांचे विधानसभा मतदारसंघही याच मतदारसंघात येतात. त्यांनी लावलेला जोर रक्षा खडसेंसाठी बुस्टर ठरला.

विधानसभा मतदारसंघनिहायची कारणे -

१) चोपडा

चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे युतीमुळे भाजपच्या मदतीला आले. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील चांगला जोर लावल्याने रक्षा खडसे चोपड्यात आघाडीवर राहिल्या. तुलनेने याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. उल्हास पाटलांसाठी हवी तशी मेहनत घेतली नाही. भाजपच्या नेत्यांनी चोपड्यात आधीपासून लक्ष केंद्रीत केले होते. त्याचा फायदा खडसेंना झाला.

२) रावेर-यावल

रावेर लोकसभा मतदारसंघात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा रावेर-यावल हा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वर्चस्वाखाली आहे. याठिकाणी माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनीही रक्षा खडसेंसाठी परिश्रम घेत मतदारसंघ पिंजून काढला. या मतदारसंघातील फैजपूर, यावल, सावदा या नगरपालिकांवर भाजप आणि सेनेची सत्ता आहे. शिवाय अनेक बाजार समित्या, ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता असल्याने रक्षा खडसेंना मताधिक्य वाढण्यास मदत झाली.

३) भुसावळ

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय सावकारे यांना भाजपत घेवून त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली व निवडूनही आणले. या मतदारसंघात भाजप रुजवण्याचे काम एकनाथ खडसेंनी केले आहे. भुसावळ नगरपालिकेवर २०१५ च्या निवडणुकीत प्रथमच स्वबळावर भाजपची सत्ता आली होती. या साऱ्या घडामोडींचा फायदा आता भाजपला झाला. वरणगाव नगरपालिकेवर नगराध्यक्ष सुनील काळेंच्या माध्यमातून जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचे वर्चस्व आहे. येथूनही रक्षा खडसेंना मदत झाली. दुसरीकडे, काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील सर्वच आघाड्यांवर मागे पडले. दीर्घकाळांतर स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी आमदार संतोष चौधरी यांनी निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले.

४) जामनेर

हा मतदारसंघ म्हणजे गिरीश महाजन यांचे वर्चस्व असलेला बालेकिल्ला. याठिकाणी नगरपालिकेवरही भाजपची बहुमताने सत्ता आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यासोबत रक्षा खडसेंना कोण जास्त मताधिक्य मिळवून देतो, अशी पैज लावली होती. ती पैज महाजन यांनी जिंकली आहे. जामनेर तालुक्यात भाजपचे पक्ष संघटन उत्तम असल्याने याठिकाणी काँग्रेस मागे पडली.

५) मुक्ताईनगर-बोदवड

मुक्ताईनगर आणि बोदवड नगरपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. याशिवाय खुद्द एकनाथ खडसे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे भाजपला येथून मताधिक्य मिळेल, यात शंकाच नव्हती. उत्सुकता होती ती फक्त रक्षा खडसेंना किती मताधिक्य मिळते याची. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन नावालाच उरले आहे. त्यामुळे येथेही डॉ. उल्हास पाटलांना प्रतिकूल परिस्थिती होती.

६) मलकापूर

मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. मलकापूर आणि नांदुरा या नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. विद्यमान आमदार चैनसुख संचेती निवडणूक जाहीर झाल्यापासून रक्षा खडसेंसोबत राहिले. त्यांनी भाजपसाठी चांगला जोर लावला. याशिवाय खासदार म्हणून रक्षा खडसेंनी या मतदारसंघात केलेली विकासकामे त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरल्या.

चोपडा : रक्षा खडसे, भाजप (१२६७०७),
डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४९३७५)

रावेर :
रक्षा खडसे, भाजप (१०८००८)
डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (६८५७९)

भुसावळ :
रक्षा खडसे, भाजप (९५३९४),
डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४४५०५)

जामनेर :
रक्षा खडसे, भाजप (१०७६३२),
डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (६२०६१)

मुक्ताईनगर :
रक्षा खडसे, भाजप (१०७६३२),
डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४७५३०)

मलकापूर :
रक्षा खडसे, भाजप (१०७०८५),
डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४६५८९)

Intro:Please use file photos of candidate
जळगाव
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना अस्मान दाखवले आहे. या निकालामुळे माजीमंत्री एकनाथ खडसेंचे वलय पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दुसरीकडे या मतदारसंघात विरोधकांना सतत अपयश येत असल्याने त्यांच्यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.Body:बुथरचनेपासून भाजपचे तगडे संघटन आणि वैयक्तिक जनसंपर्क, मोदी फॅक्टर तसेच माजीमंत्री एकनाथ खडसेंचा मतदारसंघावरील प्रभाव, या त्रिसूत्रीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला आहे. या निवडणुकीत वाढलेले तरुणांचे मतदानही भाजपच्या पारड्यात पडल्याने २०१४ च्या तुलनेत यावर्षी त्यांचे मताधिक्य ४९ हजार ९३४ ने वाढून ३ लाख ३५ हजार ८८२ वर पोहोचले. रावेर लोकसभा मतदारसंघात माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा जबरदस्त प्रभाव आहे. नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतींवर असलेली भाजप-सेनेची सत्ता तसेच भाजपकडे असलेल्या प्रचाराची सक्षम यंत्रणा रक्षा खडसे यांच्यासाठी मदतीची ठरली. या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस की राष्ट्रवादीकडे हा तिढा शेवटपर्यंत सुरु होता. राष्ट्रवादीने मराठा पाटील समाजाच्या उमेदवाराचे नावही जवळपास निश्चित केले होते. मात्र, काँग्रेसने अखेरपर्यंत दावा कायम ठेवून ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली. अखेरच्या क्षणाला डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. या तुलनेत रक्षा खडसे यांचे भाजपच्या पहिल्याच यादीत नाव आल्याने त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी नव्हती. तर दुसरीकडे खासदार रक्षा खडसे यांच्या मागील टर्ममध्ये मतदारसंघातील प्रत्येक गावात जनसंपर्क वाढल्याने कार्यकर्त्यांची मजबूत फळी होती. त्याचा लाभ त्यांना झाला. रावेर लोकसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाच्या तुलनेत एकट्या रक्षा खडसेंना तब्बल ५९.९६ टक्के मतदान झाले. रावेर लोकसभा मतदारसंघात पूर्वी काँग्रेसची ताकद चांगली होती. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांनी काळाची पावले न ओळखल्याने भाजपने हा मतदारसंघ काबीज केला. उल्हास पाटलांचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे व डॉ. उल्हास पाटील यांच्यात प्रमुख लढत होती. दोन्ही उमेदवार हे लेवा समाजाचे असल्याने मतांचे ध्रुवीकरण होऊन मराठा, गुर्जर, माळी, बौद्ध आदी समाज निर्णायक ठरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एकनाथ खडसेंचे मतदारसंघावर असलेले वलय पाहता सर्व समाज रक्षा खडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय असलेल्या उल्हास पाटलांची ताकद याठिकाणी कमी पडली. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसची मते विभागली गेली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजीमंत्री एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांचे विधानसभा मतदारसंघही याच मतदारसंघात येतात. त्यांनी लावलेला जोर रक्षा खडसेंसाठी बुस्टर ठरला. युतीमुळे शिवसेना मदतीला होतीच.

विधानसभा मतदारसंघनिहायची कारणे-

१) चोपडा
चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे युतीमुळे भाजपच्या मदतीला आले. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील चांगला जोर लावल्याने रक्षा खडसे चोपड्यात आघाडीवर राहिल्या. तुलनेने याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. उल्हास पाटलांसाठी हवी तशी मेहनत घेतली नाही. भाजपच्या नेत्यांनी चोपड्यात आधीपासून लक्ष केंद्रीत केले होते. त्याचा फायदा खडसेंना झाला.

२) रावेर-यावल
रावेर लोकसभा मतदारसंघात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा रावेर-यावल हा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वर्चस्वाखाली आहे. याठिकाणी माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनीही रक्षा खडसेंसाठी परिश्रम घेत मतदारसंघ पिंजून काढला. या मतदारसंघातील फैजपूर, यावल, सावदा या नगरपालिकांवर भाजप आणि सेनेची सत्ता आहे. शिवाय अनेक बाजार समित्या, ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता असल्याने रक्षा खडसेंना मताधिक्य वाढण्यास मदत झाली.

३) भुसावळ
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय सावकारे यांना भाजपत घेवून त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली व निवडूनही आणले. या मतदारसंघात भाजप रुजविण्याचे काम एकनाथ खडसेंनी केले आहे. भुसावळ नगरपालिकेवर २०१५ च्या निवडणुकीत प्रथमच स्वबळावर भाजपची सत्ता आली होती. या साऱ्या घडामोडींचा फायदा आता भाजपला झाला. वरणगाव नगरपालिकेवर नगराध्यक्ष सुनील काळेंच्या माध्यमातून जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचे वर्चस्व आहे. येथूनही रक्षा खडसेंना मदत झाली. दुसरीकडे, काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील सर्वच आघाड्यांवर मागे पडले. दीर्घकाळांतर स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलेले माजी आमदार संतोष चौधरी यांनी निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील उल्हास पाटलांना साथ दिली नाही. त्यामुळे रक्षा खडसे वरचढ ठरल्या.

४) जामनेर
हा मतदारसंघ म्हणजे गिरीश महाजन यांचे वर्चस्व असलेला बालेकिल्ला. याठिकाणी नगरपालिकेवरही भाजपची बहुमताने सत्ता आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यासोबत रक्षा खडसेंना कोण जास्त मताधिक्य मिळवून देतो, अशी पैज लावली होती. ती पैज महाजन यांनी जिंकली आहे. जामनेर तालुक्यात भाजपचे पक्ष संघटन उत्तम असल्याने याठिकाणी काँग्रेस मागे पडली.

५) मुक्ताईनगर-बोदवड
मुक्ताईनगर आणि बोदवड नगरपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. याशिवाय खुद्द एकनाथ खडसे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे भाजपला येथून मताधिक्य मिळेल, यात शंकाच नव्हती. उत्सुकता होती ती फक्त रक्षा खडसेंना किती मताधिक्य मिळते याची. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन नावालाच उरले आहे. त्यामुळे येथेही डॉ. उल्हास पाटलांना प्रतिकूल परिस्थिती होती.

६) मलकापूर
मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. मलकापूर आणि नांदुरा या नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. विद्यमान आमदार चैनसुख संचेती निवडणूक जाहीर झाल्यापासून रक्षा खडसेंसोबत राहिले. त्यांनी भाजपसाठी चांगला जोर लावला. याशिवाय खासदार म्हणून रक्षा खडसेंनी या मतदारसंघात केलेली विकासकामे त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरल्या. काँग्रेसकडे मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा नव्हता. याशिवाय मोदी फॅक्टर, राष्ट्रहित, युवकांचा भाजपकडे असलेला कल या बाबी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरल्या.Conclusion:विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते-
 
चोपडा : रक्षा खडसे, भाजप (१२६७०७), डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४९३७५)

रावेर : रक्षा खडसे, भाजप (१०८००८), डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (६८५७९)

भुसावळ : रक्षा खडसे, भाजप (९५३९४), डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४४५०५)

जामनेर : रक्षा खडसे, भाजप (१०७६३२), डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (६२०६१)

मुक्ताईनगर : रक्षा खडसे, भाजप (१०७६३२), डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४७५३०)

मलकापूर : रक्षा खडसे, भाजप (१०७०८५), डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस (४६५८९)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.