जळगाव - जिल्ह्यात दररोज नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. जेवढे रुग्ण आढळतील त्यांच्यावर उपचार करून त्यांना तपासून वाचवले जाईल, असे जिल्हा प्रशासनाला वाटते त्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी रोज दोन हजारांवर आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत.
आरटीपीसीआर चाचण्या घेणे झाले कमी
पालिका क्षेत्रातील सर्वच आरोग्य यंत्रणांच्या दररोज होणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्या वाढवण्याची गरज आहे. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी भेटीद्वारे सर्वेक्षण करून तसेच स्थानिक वैद्यकीय व्यवसायिकांच्या मदतीने लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद करावी. त्यांच्या कोविड चाचण्या कराव्यात. जनतेशी मोठ्या प्रमाणात संपर्कात येणाऱ्या व्यक्ती जसे भाजी विक्रेते, किराणा, दुकानदार, फळविक्रेते यांच्या कोविड चाचण्या कराव्यात. भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा या पालिका क्षेत्रात दैनंदिनी चाचण्या कराव्यात. याव्यतिरिक्त इतर पालिका क्षेत्रात दैनंदिनी चाचण्या कराव्यात.
दररोज दोन हजार कोरोना चाचण्या करा
जिल्ह्यात दररोज दोन हजार ७० कोरोना चाचण्या होणे गरजेचे आहे. आपल्या कार्यक्षेत्रात दिलेल्या उद्दिष्टा इतक्या चाचण्यांची संख्या साध्य होईल, या दृष्टीने नियोजन आणि कार्यवाही करावी. नियोजन व त्याच्या अंमलबजावणीत कुठल्याही प्रकारे ढिलाई होऊ नये, याची दक्षता वैयक्तिकरीत्या घ्यावी, अन्यथा पुढील होणाऱ्या प्रशासकीय कारवाईस आपण स्वतः जबाबदार असाल, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.
हेही वाचा - धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रार करणारी महिला पोलीस ठाण्यात दाखल